‘देवद आश्रमातील साधकांची साधना आणि सेवा या दृष्टीने घडी बसवण्यासाठी पू. (सौ.) अश्विनी पवार सतत तळमळीने प्रयत्न करतात. त्या सर्वांना आपलेपणाने आणि आईच्या मायेने सांभाळून पुढे घेऊन जात आहेत.
१. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी देवद आश्रमातील साधकांना साधनेच्या दृष्टीने सिद्ध करण्यासाठी तळमळीने केलेले प्रयत्न !
१ अ. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांमुळे साधकांची साधना थांबू नये’, यासाठीपू. (सौ.) अश्विनी पवार करत असलेले प्रयत्न : पू. (सौ.) अश्विनी पवार आश्रमात आलेल्या प्रत्येक साधकावर सारखेच प्रेम करतात. साधकांकडून चूक झाली किंवा त्याच्यात अनेक ‘स्वभावदोष आणि अहं’ असले, तरी त्या त्याला साधनेत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. साधकातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे त्याची साधना थांबली असली, तरी त्या त्याला तेथेच थांबू न देता योग्य मार्गदर्शन करून पुढे जाण्याची दिशा देतात.
१ आ. साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा सत्संग घेऊन साधकांची साधना पुढे चालू ठेवण्यासाठी घेत असलेले कष्ट : त्या आश्रमातील साधकांच्या व्यष्टी साधनेचे आढावे घेऊन ‘ते नेमके कुठे न्यून पडत आहेत ? ते साधनेत कुठे अडकले आहेत ?’, हे सांगून प्रत्येक साधकाला साधनेत पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. साधकांना आरंभी ते सर्व कठीण वाटते; पण पू. अश्विनीताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर त्यांना साधनेत प्रगती करता येते आणि खरा आनंद मिळतो. अनेक साधक याची अनुभूतीही घेत आहेत.
२. ‘स्वयंपाकघरातील साधकांची साधना व्हावी’ यासाठी पू. अश्विनीताई तळमळीने करत असलेले प्रयत्न
स्वयंपाकघरात सेवा करणार्या साधकांची साधना आणि सेवायांची घडी बसवण्यासाठी पू. अश्विनीताई पुष्कळ चिकाटीने अन् तळमळीने प्रयत्न करतात.
२ अ. स्वयंपाकघराचा फारसा अनुभव नसतांनाही शिकून घेऊन ‘पदार्थ योग्य पद्धतीने कसे करायचे ?’, हे शोधून काढणे : पू. अश्विनीताईंना स्वयंपाकघराचा फारसा अनुभव नाही, तरीही त्या प्रत्येक गोष्ट शिकून घेतात. त्यातील बारकावे शोधून ‘ते पदार्थ योग्य पद्धतीने कसे करायचे ?’, हे त्यांनी शोधून काढले आहे. त्याप्रमाणे त्या स्वयंपाकघरातील साधकांना सांगून ‘एखादा पदार्थ लहान प्रमाणात करवून घेतात आणि नंतर तोच पदार्थ मोठ्या प्रमाणात कसा बनवायचा ?’, हे त्या साधकांना शिकून घेण्यास सांगतात.
२ आ. आढावा सत्संग घेणे : त्या मागील २ वर्षांपासून सातत्याने आठवड्यातून २ वेळा स्वयंपाकघरातील साधकांकडून झालेल्या चुकांचा आढावा सत्संग घेतात. त्या साधकांना साधनेत पुढे नेण्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करतात. त्या वेळी त्या प्रत्येक साधकाला ‘त्याचे कोणते स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू त्याच्या साधनेतील अडथळे ठरत आहेत’, याची जाणीवही करून देतात. त्या ‘साधकांनी स्वतःत ईश्वरी गुण आणले पाहिजेत’, या दृष्टीने त्यांना सतत अंतःकरणापासून सांगतात.
२ ई. व्यष्टी साधनेचा आढावा घेणे : साधकांची व्यष्टी साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्या काही साधकांच्या व्यष्टी साधनेचे आढावे स्वतःच घेतात. काही साधकांच्या व्यष्टी साधनेचे आढावे घेण्यासाठी त्यांनी त्या साधकांना चांगल्या साधकांशी जोडून दिले आहे. अशा प्रकारे सर्वच स्तरांवर साधकांना पुढे नेण्याच्या दृष्टीने पू. अश्विनीताई चिकाटीने प्रयत्न करतात.
३. आश्रमात येणारे संत आणि पाहुणे यांची सेवा
आश्रमात येणारी ‘प्रत्येक व्यक्ती आनंदी व्हायला हवी’, असा पू. अश्विनीताईंना ध्यास असतो. त्यामुळे देवद आश्रमात येणारे संत आणि पाहुणे यांच्या नियोजनात पू. अश्विनीताई स्वतः लक्ष घालतात. त्या साधकांकडून ती सेवा अचूक व्हावी, यासाठी त्या प्रयत्न करतात. साधकांकडून त्या सेवेत झालेल्या चुका त्या प्रेमाने सांगतात आणि पुढच्या वेळी ‘कोणती उपाययोजना करायची ?’, हेही सांगतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ‘आश्रमात येणारी प्रत्येक व्यक्ती प्रभावित होते’, असे लक्षात आले आहे.
पू. अश्विनीताई यांची धडपड पाहून जणू काही ‘हिंदु राष्ट्राची घडी बसवण्यासाठीच सर्व काही चालू आहे’, असे मला वाटते.
– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.३.२०२०)