श्री बगलामुखीदेवीच्या मंत्रोच्चारणाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण
‘१२, १३ आणि १४ सप्टेंबर २०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या श्री गणेशयागाला आरंभ करण्यापूर्वी सुमारे एक घंटा पुरोहितांनी श्री बगलामुखीदेवीचे पुढील मंत्र म्हटले.
ॐ आं क्लीं ख्लीं क्लौं हुं ऐं क्लीं ह्रीं श्रीं बगलामुखि आवेशय आवेशय ।
आं ह्रीं क्रौं मम हृदये आवह आवह सन्निधिं कुरु ।
आं ह्रीं क्रौं मम हृदये ‘शीखं शीरं दृष्ट दृष्ट’।
आं ह्रीं क्रौं हुं फट् स्वाहा ॥
१. ब्रह्मास्त्राचे आवाहन करणारे श्री बगलामुखीदेवीचे मंत्र पुरोहित म्हणत असतांना जाणवलेली सूत्रे
१ अ. पुरोहितांच्या ठिकाणी मंत्रद्रष्ट्या ऋषींचे अस्तित्व जाणवून त्यांच्या मुखातून अस्त्रांची निर्मिती होऊन त्यांचे अष्टदिशांना प्रक्षेपण होतांना जाणवले.
१ आ. साधक-पुरोहितांनी क्षात्रभावाने आवेशपूर्ण मंत्र म्हटल्यावर देवी वीरश्रीने संग्राम करत असल्याचे जाणवणे : देवीचे वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध चालू असल्याचे जाणवले. जसजसे मंत्र म्हटले जात होते, तसतशी देवी समोर येणार्या वाईट शक्तींशी घनघोर युद्ध करत असल्याचे जाणवले. ‘फट्’चे उच्चारण होताच देवी तिच्या हातातील खड्गाने वाईट शक्तींना दूर करत होती. साधक-पुरोहित जितक्या क्षात्रभावाने आवेशपूर्ण मंत्र म्हणत होते, तितक्या वीरश्रीने देवी संग्राम करत असल्याचे जाणवत होते.
१ इ. यज्ञवेदीतून ब्रह्मास्त्राचे दर्शन होणे, ब्रह्मास्त्राच्या अग्रभागावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवाच्या भोवतीच्या पांढर्या तेजोमय चैतन्याच्या आभेमुळे ब्रह्मास्त्राच्या अग्रभागाभोवती श्वेत रंगाची तेजोमय प्रभावळ कार्यरत असल्याचे जाणवणे : यज्ञवेदीतून लाल रंगाचा दांडा, गोलाकार पिवळा अग्रभाग आणि भोवती सोनेरी रंगाचे वलय असणार्या ब्रह्मास्त्राचे दर्शन झाले. या ब्रह्मास्त्राची गती मंत्रगतीसह वृद्धींगत होतांना जाणवली, तसेच जितक्या क्षात्रभावाने मंत्र उच्चारले जात असत, तितक्या वेगाने अनेक ब्रह्मास्त्रांचे दशदिशांना प्रक्षेपण होतांना जाणवले. ब्रह्मास्त्राच्या अग्रभागावर पद्मासनाधिष्ठित ब्रह्मदेव विराजमान असल्याचे जाणवले. ब्रह्मदेवाच्या भोवती असणार्या पांढर्या रंगाच्या तेजोमय चैतन्याच्या आभेमुळे ब्रह्मास्त्राच्या अग्रभागाभोवती श्वेत रंगाची तेजोमय प्रभावळ कार्यरत असल्याचे जाणवले.
२. पुरोहितांनी विविध प्रकारे म्हटलेल्या मंत्रांचा जाणवलेला सूक्ष्म परिणाम
अ. पुरोहितांनी विशिष्ट शब्दांवर जोर देऊन मंत्र म्हटले. तेव्हा त्यांच्या नाभीवर दाब येऊन नाभीस्थित पंचप्राण वेगाने कार्यरत झाल्याचे जाणवले. जागृत झालेल्या पंचप्राणांतील ऊर्जा मंत्रांचे उच्चारण करण्यास साहाय्यक होत असल्याचे जाणवले.
आ. पुरोहितांनी उच्च स्वरात म्हटलेल्या मंत्रामुळे त्यांच्या मुखातून बाहेर पडणार्या अस्त्रांचे प्रक्षेपण मंत्राच्या स्वरासहित संपूर्ण वायूमंडलात होतांना जाणवले. ‘फट्’चे उच्चारण होताच पुरोहितांच्या मुखातून बाहेर पडणार्या अस्त्रांचा वायूमंडलात संचार करणार्या अनिष्ट शक्तींवर प्रहार होतांना जाणवत होते.
इ. पुरोहित जेव्हा क्षात्रभावाने मंत्रोच्चारण करत होते. तेव्हा मंत्रांतील शब्दांशी त्यांची एकरूपता वाढल्याचे जाणवत होते.
३. पुरोहितांनी विविध प्रकारे मंत्रोच्चारण केल्यावर सूक्ष्म स्तरावर होणारा परिणाम
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम , रामनाथी गोवा.(१४.०९.२०१६)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |