भारताचे नागरिकत्व न मिळाल्याने पाकमधील हिंदु आणि शीख शरणार्थी पुन्हा पाकमध्ये परतणार !

पाकमधील हिंदू आणि शीख यांच्यावर अत्याचार होतात म्हणून ते भारतात शरणार्थी बनून येतात. असे असूनही त्यांना नागरिकत्व न मिळणे दुर्दैवी आहे. याचा केंद्र सरकारने पुनः विचार केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

नवी देहली – केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा संमत केल्यानंतरही पाकमधून भारतात शरणार्थी म्हणून आलेले हिंदू आणि शीख यांना भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. तसेच आर्थिक तंगीमुळे त्यांनी परत पाकमध्ये जाण्याचा निश्‍चय केला आहे.

एकूण २४३ पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याची अनुमती मिळाली आहे. ते अटारी सीमेवरून परत पाकमध्ये जाणार आहेत.