रामनाथी आश्रमात ऋषीयाग असतांना एका गायीने चाटणे, ही अनुभूती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्यांनी हे मोठे भाग्य असते, असे सांगणे

रामनाथी आश्रमात ऋषीयाग असतांना एका गायीने चाटणे, ‘त्या दिवशीचा यज्ञ गोलोकातून आशीर्वाद मिळावा; म्हणून करण्यात आला होता’, हे नंतर समजणे आणि ही अनुभूती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्यांनी ‘गायीने चाटणे’ हे मोठे भाग्य असते’, असे सांगणे

सौ. अनुराधा पुरोहित

‘९.१.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ऋषीयाग झाला. ‘सर्व साधकांना गोलोकातून सर्व देवतांचा आशीर्वाद लाभावा’, यासाठी हा यज्ञ करण्यात आला. दुपारी मी यज्ञस्थळी आल्यावर वाहनातून साहित्य बाहेर काढत असतांना काळ्या रंगाची एक गाय अकस्मात् आली आणि तोंड लावायला लागली. मी दोन गाड्यांच्या मध्ये असल्यामुळे मला हलता येत नव्हते. मी हळुवारपणे तिला ‘अगं, बाहेर जा’, असे सांगितले; तरी ती हलत नव्हती. नंतर वाहनात असलेला खाऊ मी तिला घातला. तिने तो खाऊ खाल्ला आणि तरीही ती परत जवळ आली. नंतर मी कशीतरी तिला बाजूला सरकवून बाहेर आले. नंतर यज्ञस्थळी आल्यावर समजले, ‘त्या दिवशीचा यज्ञ गोलोकातून आशीर्वाद मिळावा; म्हणून करण्यात आला होता.’

एका साधिकेने ही अनुभूती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘गायीने चाटणे’ हे मोठे भाग्य असते.’’ या अनुभूतीबद्दल गुरुमाऊली, श्रीकृष्ण, गोमाता आणि सर्व देवता यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. अनुराधा पुरोहित, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक