फटाके फोडल्याने धर्मांधाकडून हिंदु महिला आणि तिची ३ मुले यांना मारहाण : महिलेचा मृत्यू

फटाके फोडण्याचा धर्मांधांना त्रास होतो, तर दिवसातून ५ वेळा देशातील लक्षावधी मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवरून वर्षानुवर्षे देण्यात येणार्‍या अजानमुळे हिंदूंना किती त्रास होत आहे, हे आता निधर्मीवादी लक्षात घेतील का ?

एटा (उत्तरप्रदेश) – हिंदूंनी फटाके फोडल्याच्या रागातून शेजारी रहाणार्‍या रशीद याने मीना देवी या महिलेला आणि तिच्या ३ लहान मुलांना अमानुष मारहाण केली. यात या मीना देवी यांचा गळा दाबल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी रशीद यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पसार झालेल्या रशीदचा शोध घेत आहेत. ही घटना येथे झुरा गावात झडली.