सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांच्या समवेत नामजप करतांना रामनाथी आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल यांना जाणवलेली सूत्रे

पू. कुसुम जलतारेआजी
सौ. वैशाली मुद्गल

१. ‘२९.७.२०१९ या सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मी सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (पू. आजी) यांच्या समवेत नामजप करायला बसले. तेव्हा माझा नामजप आपोआप चालू झाला.

२. पू. आजींनी त्यांच्या उजव्या हाताची करंगळी आकाशाच्या दिशेने आणि हाताची उर्वरित बोटे भूमीच्या दिशेने खाली केली. पू. आजींनी केलेली ही मुद्रा पहातांना मला भगवान श्रीकृष्णाची आठवण होत होती.

३. जसे काही वेळा परात्पर गुरु डॉ. आठवले (स्वतःच्या) गालाला हात लावून बसतात किंवा इतर साधकांचे कौतुक ऐकत असतात, तशा भावमुद्रेत पू. आजी बसल्याचे मला दिसले. त्यांच्यामध्ये भक्तीभाव पुष्कळ आहे आणि त्या अगदी निरागस आहेत.

४. त्यांच्या समवेत नामजप करायला बसल्यावर मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नाही.

५. पू. आजींसमवेत नामजप करतांना माझ्याकडून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’

– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक