
‘वर्ष २००१ मध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी माझा मुक्काम बेळगाव (कर्नाटक) येथे होता. ‘श्रीरामनवमीच्या दिवशी बेळगावच्या प्रसिद्ध प.पू. काणे महाराज यांच्या मठात प.पू. डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आहे’, असे मला समजले. त्याप्रमाणे मी सकाळी ९ वाजता प.पू. काणे महाराज यांच्या मठात गेलो.

मार्गदर्शनाला पुष्कळ लोक उपस्थित होते. त्या गर्दीत मी मागे बसलो होतो. तेव्हा एक गृहस्थ आले आणि त्यांनी मला एका ओळीत सर्वांत पुढे बसवले. तेथून जवळच असलेले प.पू. डॉक्टर मला स्पष्टपणे दिसत होते. थोड्याच वेळात त्यांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन चालू झाले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला वाटले, ‘श्रीराम स्वतः बोलत आहे आणि तेही स्वतःविषयी !’ त्या ४५ मिनिटांच्या मार्गदर्शनाच्या वेळी माझे डोळे अश्रूंनी भरलेले होते. त्या वेळी मला सभोवतालचे भान नव्हते. ‘भावजागृती म्हणजे काय असते ?’, हे मला त्या दिवशी प्रथमच कळले. या अनुभूतीबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अरुण डोंगरे (वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.६.२०२६)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !