१४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातूनही आम्हाला प्रचंड पाठिंबा ! – Benjamin Netanyahu

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे अमेरिकेला प्रत्युत्तर

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू व अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स

जेरुसलेम (इस्रायल) – १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातूनही आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळतो, अशा शब्दांत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे अमेरिकेला प्रत्युत्तर दिले. ‘फॉक्स न्यूज’ने नेतान्याहू यांच्या घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत ते बोलत होते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी नुकतेच ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना इस्रायलविषयी सहानुभूती आहे. मी जर इस्रायली मंत्रीमंडळात असतो, तर इस्रायलचा एकमेव शेष राहिलेल्या शक्तीशाली मित्रावर (अमेरिकेवर) मी कधीच टीका केली नसती’, असे विधान केले होते. त्यास नेतान्याहू यांनी वरील प्रत्युत्तर दिले.

नेतान्याहू पुढे म्हणाले, ‘‘आमचे इतरही अनेक मित्र आहेत. भारतासारखा १४० कोटी लोकसंख्या असलेला देश आमच्यासमवेत आहे. भारतातून आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो. फेसबुकसारख्या सामाजिक माध्यमांवरही भारतातील नागरिकांकडून आम्हाला मोठा प्रतिसाद मिळतो.’’