स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास नगरसेवक उमाकांत वारंग यांची मोर्चा काढण्याची चेतावणी

सावंतवाडी – शहरातील नागरिकांच्या नळातून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी ६ जुलै या दिवशी नगरपरिषदेत जाऊन संबंधित अधिकार्यांना धारेवर धरले. गढूळ पाण्याची बाटली घेऊनच ते मुख्याधिकार्यांना जाब विचारण्यासाठी आले होते; मात्र मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांची भेट घेत त्यांच्याकडे संताप व्यक्त केला.
‘लोकांच्या जिवाशी खेळ का करता? या दूषित पाण्यामुळे नागरिक, लहान मुले आजारी पडली, तर त्याला उत्तरदायी कोण?’, असा प्रश्न उपस्थित करत वारंग यांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली, अन्यथा नागरिकांसह नगरपरिषदेवर भव्य मोर्चा काढण्याची चेतावणीही त्यांनी दिली.
यावर प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांनी पाईपलाईनमध्ये गळती झाल्यामुळे पाणी गढूळ झाल्याचे सांगितले. दुरुस्ती त्वरित पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन अंधारे यांनी दिले.
या प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सत्यजित धारणकर, अशोक पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदु प्रेयसीची हत्या करणार्या जाहीद खानला जन्मठेप !
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
आल्त पर्वरी येथे ७ बंगल्यांमध्ये चोरी
कुडचडे येथे ४ ठिकाणी चोरीचा प्रयत्न
पार्से येथील एका व्यक्तीची ४ लाख २६ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस : अनेक ठिकाणी पडझड