
मुंबई – राज्यात सर्वत्र झालेल्या अतीवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या प्रशासकीय उत्तरदायित्वाच्या सूत्रावरून ६ जुलै या दिवशी विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. विरोधकांनी सरकारच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत चौकशीची मागणी केली, तर सरकारने ‘निसर्गाचे चक्र पालटल्याने हे संकट ओढवले’, असे सांगत याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी वेळ मागितला. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यांनी दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, परिस्थिती अधिक गंभीर आहे. नागरिकांनी सजग रहावे. ७ जुलै या दिवशी मी या परिस्थितीविषयी सभागृहात सविस्तर माहिती देईन.
‘लोक मेले तरी चालतील; पण झाडांना हात लावायचा नाही’, अशी काही जणांची मानसिकता ! – गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन
दुर्घटनाग्रस्त मानखुर्द भागाची प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन विधान परिषदेत म्हणाले की, मानखुर्दचा अनधिकृत चाळीचा परिसर अत्यंत धोकादायक झोपडपट्टीचा भाग असून तेथे कधीही काहीही घडू शकते, अशी स्थिती आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल. मुंबईत प्रतिवर्षी साधारण ७५० झाडे पडतात; मात्र यंदा केवळ २ दिवसांत ३५० झाडे उन्मळून पडली आहेत. ताशी ७० ते ९० किमी वेगाने वारे वहात असल्याने ही मोठी हानी झाली. ‘लोक मेले तरी चालतील; पण झाडांना हात लावायचा नाही’, अशी काही जणांची मानसिकता असून यामुळेच निष्पाप लोकांचा जीन गेला आहे. पुणे जिल्ह्यातील पाटण येथेही दरड कोसळून ३ लोक मृत पावले आहेत. शासकीय कार्यालये आणि शाळा प्रत्येक वेळी बंद ठेवता येत नाहीत. तरीही महानगरपालिकेने ‘मॅनहोल्स’जवळ कर्मचारी उभे केले असून आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात आहेत.
विरोधकांचे विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन !
‘मॅनहोल’मध्ये पडून, झाडे कोसळून आणि मानखुर्द येथील अनधिकृत इमारत कोसळून २ दिवसांत १२ नागरिकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हावी’, या मागणीसाठी विरोधकांनी ६ जुलैला विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन केले.
पालखी मुक्कामी असतांना पुण्यातील पाणी कपात रहित ! – महापौरांची घोषणा
सौ. अरुंधती महाडिक यांच्याकडून इतिहास आणि पाककृती एकत्र असलेल्या पुस्तकाची निर्मिती !
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ !
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
निदा खान हिला जामीन संमत !
‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’वर सरकारने थेट बंदी घालावी ! – राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, गुरुकुल शिक्षणसंस्था