विरोध करणार्या हिंदूंवर आक्रमण : ४ जण घायाळ
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील फेनी येथील फुलगाजी सदर भागातील वणिकपाडा येथे डोल मंदिराची मुसलमानांकडून तोडफोड करण्यात आली. याला विरोध करणार्या हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. या घटनेत किमान ४ हिंदू घायाळ झाले. त्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. फुलगाजी बाजारातील ‘शिल्पी ज्वेलर्स’चे मालक संजीव वणिक (वय ५० वर्षे) हे गंभीररित्या घायाळ अवस्थेत फेनी सदर रुग्णालयात उपचार घेत आहेत. याखेरीज शिल्पी चौधरी (वय ७० वर्षे), रत्ना वणिक (वय ४८ वर्षे) आणि अपूर्व वणिक (वय १० वर्षे) हेही घायाळ झाले आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
हिंदु बंधूंवर मुसलमानांकडून आक्रमण
बांगलादेशाच्या चितगावच्या तालुक्यात रात्री साहाय्यक शिक्षक रिंकू चंद्र दास आणि त्यांचा लहान भाऊ यांच्यावर मुसलमानांकडून अचानक आक्रमण करण्यात आले. यात दोघेही गंभीररित्या घायाळ झाले. स्थानिकांच्या साहाय्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. या आक्रमणात सहभागी असलेल्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या आक्रमणाचे कारण समजू शकले नाही.

८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर ३५ वर्षांच्या सलमानने केला बलात्कार !
Group Captain Asim Tariq Murder : पाकिस्तानच्या वायूदलाच्या ग्रुप कॅप्टनची दिवसाढवळ्या हत्या
P.P. Govind Dev Giri Maharaj : श्रीराममंदिरातील चोरीच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही !
PoK Protest : पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या आंदोलनावर पाक सैन्याचा गोळीबार : १ जण ठार
१४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातूनही आम्हाला प्रचंड पाठिंबा ! – Benjamin Netanyahu
Rajasthan Mosques Demolition : राजस्थानमधील पाकसीमेवरील १५ कि.मी.च्या परिघातील १२ बेकायदेशीर मशिदी उद्ध्वस्त