
पणजी, ६ जुलै (वार्ता.) – गोवा सरकारने पंढरपूर येथे जाणार्या भाविकांसाठी ‘विठ्ठल रखुमाई भवन’ उभारण्यासाठी भूखंड कह्यात घेण्याची प्रक्रिया चालू केली आहे. पुढील वर्षाच्या पंढरपूर वारीच्या पूर्वी या भवनाचे बांधकाम पूर्ण करून त्याचे उद्घाटन केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. पणजी येथे आयोजित ‘वारकरी दिंडी योजने’च्या अनुदान वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, खासदार सदानंद शेट तानावडे, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक आणि बाबू कवळेकर उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले,
१. पंढरपूर येथील या भवनाचे नाव ‘विठ्ठल रखुमाई भवन’ किंवा ‘गोवा पंढरपूर भवन’ असे ठेवण्यात येईल. याविषयीचा अंतिम निर्णय गोव्यातील वारकरी पथकांनीच घ्यायचा आहे.
२. या भवनासाठी २ सहस्र चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली असून भूखंड कह्यात घेण्याची प्रक्रिया या वारीपूर्वीच होण्याची शक्यता आहे.
३. वारकर्यांसाठी सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन वारकरी दिंडी योजना चालू केली असून या योजनेच्या अंतर्गत ४० हून अधिक वारकरी असणार्या पथकांना १ ते ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाईल.
४. या वर्षी राज्यभरातील ३६ पथकांनी नोंदणी केली असून यामध्ये ३ सहस्रांहून अधिक वारकर्यांचा समावेश आहे. हे अर्थसाहाय्य येत्या २ दिवसांत पथकांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल.
अयोध्या येथे ‘गोवा रामनिवास’ उभारणार
पुढील वर्षापासून ६० वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अयोध्या तीर्थयात्रा योजना’ चालू करण्याचा सरकारचा विचार आहे. अयोध्या येथे ‘गोवा रामनिवास’ उभारण्यासाठी भूखंड कह्यात घेण्यात आला असून या ठिकाणी गोमंतकीय भाविकांची नाममात्र शुल्क आकारून रहाण्याची सोय केली जाईल.
पालखी मुक्कामी असतांना पुण्यातील पाणी कपात रहित ! – महापौरांची घोषणा
सौ. अरुंधती महाडिक यांच्याकडून इतिहास आणि पाककृती एकत्र असलेल्या पुस्तकाची निर्मिती !
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ !
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
निदा खान हिला जामीन संमत !
‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’वर सरकारने थेट बंदी घालावी ! – राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, गुरुकुल शिक्षणसंस्था