बदलापूर येथे गोमांस विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ३ धर्मांधांना अटक

ठाणे, ६ जुलै (वार्ता.) – गोवंश हत्याबंदी कायदा असतांना कायद्याला न जुमानता बदलापूर येथील एका तलाव परिसरात धर्मांधांनी गोहत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. (गोवंश हत्याबंदी कायद्याचे जराही भय वाटत नसल्यामुळे धर्मांधांकडून असे प्रकार घडतात. हे रोखण्यासाठी कठोर कारवाई पोलीस करत नाहीत, हेच दुर्दैव आहे ! – संपादक)

बदलापूर येथील तलाव परिसरात गोहत्या करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेथे धाड घातली असता तोहित मनसुर शेख, जाफर इब्राहिम शेख आणि मुस्तफा इलाही देहान हे मांस विक्रीसाठी डब्यात भरतांना आढळले. पोलिसांनी मांसाचे नमुने पडताळणीसाठी पाठवले आहेत. (मांसविक्रीच्या नमुन्यांचा अहवाल कधीच वेळेत येत नाही आणि आला तरी ते गोमांस असल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे आरोपी सुटतात, असे अनेकदा घडते. यावर प्रशासन काय उपाय करणार ? – संपादक) आरोपींना अंबरनाथ न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींपैकी तोहित मनसुर शेख याच्या भावंडांवर गोहत्या केल्याप्रकरणी यापूर्वी मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

छत्रपती शिवरायांनी गोमातेची हत्या करणार्‍यांना दिलेल्या शिक्षेप्रमाणे शिक्षा गोहत्यार्‍यांना होत नाही, तोपर्यंत गोमांस तस्करी आणि विक्री चालूच राहील, असेच गोप्रमींना वाटते !