
पुणे – सिंहगड शैक्षणिक संस्थेतील २७ शिक्षकांचे ५ कोटी ६ लाख रुपयांचे वेतन थकवून अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे संस्थापक मारुति नवले, सचिव सुनंदा मारुति नवले, उपाध्यक्ष रचना नवले, उपाध्यक्ष रोहित नवले, लेखा विभागातील संजय मोरे, शरद जराड यांच्यासह अन्य विश्वस्तांच्या विरोधात अपहरण आणि फसवणुकीचा गुन्हा भारती पोलीस ठाण्यात नोंद केला आहे. साडेपाच वर्षांपासून वेतन न मिळाल्याने शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. थकीत वेतन मिळावे यांसाठी संबंधित शिक्षकांनी संस्थेकडे पाठपुरावा केला होता; मात्र त्यानंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. (सिंहगड शिक्षण संस्थेतील वेतनाचा प्रश्न गंभीर होणे, हे शिक्षणसंस्थेला लज्जास्पद आहे ! वेतनाच्या प्रश्नी शिक्षण संस्थेमध्ये कुणाचा अंकुश कसा नाही ? शिक्षकांचे वेतन थकीत झाल्यामुळे झालेल्या हानीचे दायित्व कोण घेणार ? संबंधितांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)
या प्रकरणाचे पुढील अन्वेषण वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत. आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, वेतन नोंदी आणि संस्थेच्या लेखा व्यवहारांचे अन्वेषण झाल्यावर आणखी काही सूत्रे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पालखी मुक्कामी असतांना पुण्यातील पाणी कपात रहित ! – महापौरांची घोषणा
सौ. अरुंधती महाडिक यांच्याकडून इतिहास आणि पाककृती एकत्र असलेल्या पुस्तकाची निर्मिती !
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ !
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
निदा खान हिला जामीन संमत !
‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’वर सरकारने थेट बंदी घालावी ! – राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, गुरुकुल शिक्षणसंस्था