
रावलाकोट (पाकव्याप्त काश्मीर) – येथे पाक सैन्याच्या विरोधात आंदोलन करणार्या स्थानिक नागरिकांवर पाक सैन्याने गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे ४० सहस्रांहून अधिक नागरिक आंदोलन करत होते. ‘जम्मू-काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी’कडून हे आंदोलन करण्यात येत आहे. या संघटनेचा आरोप आहे की, डुडियालच्या ए.एम्.बी. परिसरात शांततापूर्ण निदर्शन करणार्या लोकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार केला. यात अनेक लोक गंभीर घायाळ झाले.
विदेशातही निदर्शने
ऑकलंड, न्यूझीलंड येथे निदर्शने
‘जम्मू-काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी’च्या आवाहनावरून न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे रहाणार्या काश्मिरी समुदायानेही निदर्शने केली. आंदोलकांनी संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्य शौकत नवाज मीर यांच्या अटकेचा निषेध केला आणि त्यांच्या सुटकेची मागणी केली. निदर्शनात ‘लाँग लिव्ह काश्मीर’ (काश्मीर चिरायू होवो) आणि ‘लाँग लिव्ह द पीपल’ (जनता चिरायू होवो) अशा घोषणा देण्यात आल्या.
लंडन, युके येथेही निदर्शने
‘जम्मू-काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी’ने म्हटले आहे की, लंडनमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी पाकव्याप्त काश्मीरच्या समर्थनार्थ आवाज उठवला आणि निष्पाप नागरिकांविरुद्ध झालेल्या हिंसेचा निषेध केला. परदेशात रहाणारे काश्मिरी त्यांच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते आम्हाला समर्थन देतच रहातील.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाच्या ब्रिटनच्या शाखेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पक्षाचा दावा आहे की, निदर्शनांच्या काळात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, शेकडो लोक घायाळ झाले आहेत आणि मोठ्या संख्येने निदर्शनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
Group Captain Asim Tariq Murder : पाकिस्तानच्या वायूदलाच्या ग्रुप कॅप्टनची दिवसाढवळ्या हत्या
१४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातूनही आम्हाला प्रचंड पाठिंबा ! – Benjamin Netanyahu
Bangladesh Temple Attack : बांगलादेशात मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड
एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व किंवा तिचे परदेशी नाव तिची हिंदु धर्मावरील श्रद्धा ठरवू शकत नाही ! – Madras High Court
Rama Duwaji : अमेरिकेचा २५० वा स्थापना दिनाचा उत्सव असतांना न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांच्या पत्नी गेल्या स्पेनमधील इस्लामी कार्यक्रमाला !
POK Protest : पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनाला काश्मीरमधील नागरिकांनी पाठिंबा द्यावा !