
पणजी, ६ जुलै (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ६ जुलै या दिवशी अंतरिम आदेश देतांना नवीन मोठ्या कॅसिनो नौकेच्या मांडवी नदीतील प्रवेशावरील स्थगिती कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी १८ ऑगस्ट या दिवशी ठेवली आहे. तूर्तास ही मोठी कॅसिनो नौका मुरगाव बंदरात नांगरून ठेवली आहे आणि न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ही नौका मांडवी नदीत प्रवेश करू शकणार नाही.
१. मांडवी नदीत सध्या कार्यरत असलेल्या ७० प्रवासी क्षमतेच्या कॅसिनो नौकांऐवजी २ सहस्र प्रवासी क्षमतेची कॅसिनो नौका आणण्याचा कॅसिनो आस्थापनाचा प्रस्ताव आहे.
२. कॅसिनो आस्थापनाच्या या प्रस्तावाच्या विरोधात ‘इनफ इज इनफ’ या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.
३. ‘इनफ इज इनफ’ संघटनेने जनहित याचिकेद्वारे मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंवर सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. मांडवीतील कॅसिनो नौका मांडवीतून अन्यत्र स्थलांतरित करण्यास होत असलेला विलंब, ‘गोवा सार्वजनिक जुगार कायद्या’ची प्रभावी कार्यवाही न होणे, कॅसिनोच्या संदर्भातील नियमावली सिद्ध करण्यास होणारा विलंब आणि संबंधित यंत्रणांची निष्क्रीयता याविषयी सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
४. या जनहित याचिकेवर ६ जुलै या दिवशी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी राज्य सरकार आणि एक प्रतिवादी यांनी उत्तरादाखल त्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.
५. या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्ता ‘इनफ इज इनफ’ या संघटनेने प्रत्युत्तर (रिजाँडर) प्रविष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे २ आठवड्यांची मुदत मागितली आणि न्यायालयाने ही मुदत दिली आहे.
पालखी मुक्कामी असतांना पुण्यातील पाणी कपात रहित ! – महापौरांची घोषणा
सौ. अरुंधती महाडिक यांच्याकडून इतिहास आणि पाककृती एकत्र असलेल्या पुस्तकाची निर्मिती !
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ !
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
निदा खान हिला जामीन संमत !
‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’वर सरकारने थेट बंदी घालावी ! – राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, गुरुकुल शिक्षणसंस्था