Rama Duwaji : अमेरिकेचा २५० वा स्थापना दिनाचा उत्सव असतांना न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांच्या पत्नी गेल्या स्पेनमधील इस्लामी कार्यक्रमाला !

सामाजिक माध्यमांत टीका

न्यूयॉर्क (अमेरिका) – न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी हे एकीकडे अमेरिकेच्या २५० व्या स्थापना दिनाच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतांना दुसरीकडे त्यांच्या पत्नी रमा दुवाजी यांनी स्पेनमध्ये ‘द वुमेन्स सँक्चुअरी’ने आयोजित ‘प्लँट्स ऑफ द कुरान’ नावाच्या एका ‘रिट्रीट’ (अध्यात्मिक/सांस्कृतिक शिबीर) कार्यक्रमात भाग घेतला आहे. एवढेच नाही, तर त्या ९ ते १४ जुलै या काळात फ्रान्समधील कोर्सिका येथे होणार्‍या ‘मॅरी इन द कुरान’ या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे सामाजिक माध्यमांत ‘त्यांनी या प्रवासासाठी नेमकी याच वेळेची निवड का केली ?’, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.

येथील नगर परिषदेच्या महिला सदस्या जोआन एरियोला म्हणाल्या की, ‘रमा दुवाजी यांच्या अमेरिकेतील उत्सव सोडून सुटीवर जाण्याचा निर्णयावरून त्यांची अमेरिकाविरोधी विचारसरणी उघड होते.’ नगर परिषद सदस्या फ्रँक मोरान यांनीही ही अत्यंत निराशाजनक घटना असल्याचे म्हटले आहे. महापौर कार्यालयाने या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.

संपादकीय भूमिका

महापौर झोहरान ममदानी स्वतः गेले नाहीत, याचेच न्यूयॉर्कमधील जनतेला आश्चर्याचे वाटत असेल ! कोणत्याही मुसलमानाला देशापेक्षा धर्म अधिक महत्त्वाचा वाटतो, हे केवळ भारतातच नाही, तर विदेशातही पहायला मिळते !