मुंबई – ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर’च्या नवनियुक्त कार्यकारिणी मंडळाचा पदग्रहण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. या वेळी ‘गाव तिथे उद्योजक’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या अभियानाचा उद्देश प्रत्येक गावात किमान एक यशस्वी उद्योजक घडवून ग्रामीण भागाचे रूपांतर प्रगतीच्या प्रमुख केंद्रांमध्ये करणे हा आहे. ‘गाव तिथे उद्योजक इनक्युबेशन काउन्सिल’च्या माध्यमातून ५ वर्षांच्या कालावधीत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ३६ सहस्र ग्रामीण सूक्ष्म उद्योजक सिद्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातून १ लाख ४४ सहस्रांहून अधिक शाश्वत स्थानिक रोजगारांची निर्मिती होणार असून तिसर्या वर्षापासून वार्षिक ३ सहस्र ६०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या ५ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे अभियान चालू केले जाईल. नवउद्योजकांना शेती, अन्न प्रक्रिया, हस्तकला आणि डिजिटल सेवा या क्षेत्रांत कर्जपुरवठा, ‘ब्रँडिंग’ आणि तंत्रज्ञानाचे सर्व साहाय्य केले जाईल, ज्यामुळे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवून ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ ही संकल्पना प्रत्यक्षात येईल.

पालखी मुक्कामी असतांना पुण्यातील पाणी कपात रहित ! – महापौरांची घोषणा
सौ. अरुंधती महाडिक यांच्याकडून इतिहास आणि पाककृती एकत्र असलेल्या पुस्तकाची निर्मिती !
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
निदा खान हिला जामीन संमत !
‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’वर सरकारने थेट बंदी घालावी ! – राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, गुरुकुल शिक्षणसंस्था
बदलापूर येथे गोमांस विक्री करण्याच्या सिद्धतेत असलेल्या ३ धर्मांधांना अटक