१५ जुलैपूर्वी सर्व अनधिकृत कूपनलिकांना टाळे ठोकण्याचे उच्च न्यायालयाचे जलस्रोत खात्याला निर्देश

पणजी, ६ जुलै (वार्ता.) – चिंबल परिसरातील अनधिकृत कूपनलिकांवर संथ गतीने कारवाई केल्याविषयी नापसंती व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने जलस्रोत खात्याच्या सचिवांना १५ जुलैला होणार्या पुढील सुनावणीच्या पूर्वी सर्व अनधिकृत कूपनलिका शोधून त्यांना टाळे ठोकले गेले आहे, याची निश्चिती करावी, असे निर्देश दिले आहेत.
उच्च न्यायालय म्हणाले, ‘‘जलस्रोत खात्याने आतापर्यंत ७० अनधिकृत कूपनलिकांची ओळख पटवली असली, तरी त्यांपैकी केवळ २७ कूपनलिकांना टाळे ठोकले आहे, तसेच १२ व्यक्तींनी त्यांच्या अनधिकृत कूपनलिका नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. जलस्रोत खाते चिंबल येथील ‘धारवाडकर कॉलनी’ आणि ‘शेराव कॉलनी’ येथे अनधिकृत कूपनलिका शोधण्याचे काम अत्यंत संथ गतीने करत आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही अनधिकृत कूपनलिकेला नियमित करण्याची अनुमती जलस्रोत खात्याने देऊ नये.’’
पालखी मुक्कामी असतांना पुण्यातील पाणी कपात रहित ! – महापौरांची घोषणा
सौ. अरुंधती महाडिक यांच्याकडून इतिहास आणि पाककृती एकत्र असलेल्या पुस्तकाची निर्मिती !
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ !
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
निदा खान हिला जामीन संमत !
‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’वर सरकारने थेट बंदी घालावी ! – राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, गुरुकुल शिक्षणसंस्था