‘सकल हिंदु समाजा’च्या आक्रमक भूमिकेचा परिणाम

जयसिंगूपर (जिल्हा कोल्हापूर) – येथील एका दैनिकाचे वार्ताहर हुसेन शेख यांनी हिंदु धर्मातील देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी ‘हिंदूंच्या देवता दगड आहेत. त्यांनी मंदिरात कशाला जाता ?, दान कशाला करता ?, त्यापेक्षा जिवंत माणसाला साहाय्य करा’, असे हिंदुद्वेषी विधान केले होते. यावर ‘सकल हिंदु समाजा’ने तात्काळ पत्रकार हुसेन शेख यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात निवेदन देत त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. सकल हिंदु समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे हुसेन शेख यांना लेखी खुलासा करत हिंदूंची क्षमायाचना करावी लागली.
पोलीस ठाण्यात निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. राजेंद्र गाडीवडर, श्री. शैलेंद्र लोहिया, नगरसेवक श्री. संतोष जाधव, भाजपचे श्री. महेंद्र दाईंगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेंद्र रजपूत, श्री. सुनील भोरे, श्री. धीरजलाल पटेल, श्री. कैलास देशमुख, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे उपस्थित होते. हुसेन शेख यांनी केलेल्या क्षमायाचनेत ‘मी माझ्या हिंदु बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. माझ्या वक्तव्यामुळे सकल हिंदु समाजाचे मन दुखावले जाणार नाही, याची मी काळजी घेईन’, असे हुसेन शेख यांनी म्हटले आहे.
पालखी मुक्कामी असतांना पुण्यातील पाणी कपात रहित ! – महापौरांची घोषणा
सौ. अरुंधती महाडिक यांच्याकडून इतिहास आणि पाककृती एकत्र असलेल्या पुस्तकाची निर्मिती !
‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचा शुभारंभ !
हिंदु प्रेयसीची हत्या करणार्या जाहीद खानला जन्मठेप !
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
निदा खान हिला जामीन संमत !