आदिवासी समाजावरील आघात आणि उपाययोजना !

१. ख्रिस्त्यांकडून आदिवासी समाजाचे धर्मांतर

‘आदिवासी बंधूभगिनी अत्यंत भोळेभाबडे आणि मनाने अत्यंत सरळ असतात. ते सदैव धर्माच्याच बाजूने असतात. अन्य धर्मीय लोक त्यांना फसवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. अनेक धर्मनिरपेक्षतावादी हे भारताला धर्मनिरपेक्ष बनवण्यासाठी पाश्चात्त्य विकृती भारतात आणू इच्छितात. ते नेहमी या आदिवासी समाजाला लक्ष्य करतात. या आदिवासी समाजाला क्रांतीकारक बिरसा मुंडा, जयनारायण प्रतापसिंग, वीरांगना अवंतीबाई, दुर्गावती अशा लोकांनी जागृत केले आणि त्यांना कुठेही भटकू दिले नाही. आजच्या काळात असे महापुरुष नसल्याने मतपेटीसाठी लोभी राजकारण्यांकडून आदिवासींचे शोषण केले जात आहे.

आपल्या लोकांना आपल्याच लोकांच्या विरुद्ध शस्त्र बनवून वापरले जात आहे. त्या माध्यमातून आदिवासी समूहातील लोकांना भ्रमित करून फूट पाडली जात आहे. दूरवरच्या गावांमध्ये, जंगलांमध्ये आणि लहान लहान गल्ल्यांमध्येही जाऊन काही ख्रिस्ती दलाल पैसे घेऊन ख्रिस्ती प्रचारकांसाठी काम करत आहेत. ते त्यांना ‘हे जल, जंगल आणि भूमी त्यांचीच आहे. त्यावर त्यांचाच हक्क असल्यामुळे तेथे एकही आश्रम किंवा मंदिर होऊ देऊ नका’, असे सांगतात. प्रत्यक्षात तेथे ख्रिस्ती प्रार्थनास्थळे बनवली जातात. आदिवासींना हिंदु संतांच्या विरोधात भडकवले जाते. परिणामी काही वर्षांपूर्वी या आदिवासींच्या हातून अनुमाने ६५ जिवांची निर्दयीपणे हत्या घडली होती.

पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज यांचा परिचय

पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज

पू. श्री रामबालकदास महात्यागीजी महाराज श्री जांभळी पाटेश्वरदास रेवा महाराज संस्थान, छत्तीसगडचे संचालक आहेत. ते या संस्थानाच्या माध्यमातून धर्मांतर थांबवणे, धर्मांतरितांना स्वधर्मात परत घेणे, गोरक्षण आणि हिंदु धर्मरक्षण करणे यांसाठी संघटितपणे प्रयत्न करतात. ते हिंदु धर्मरक्षणासाठी राज्यभरात युवकांना संघटित करून त्यांना धर्मशिक्षण देण्याचे अभियान चालवत आहेत. ते ‘ऑनलाईन सत्संगा’च्या माध्यमातून लाखो हिंदूंना मार्गदर्शन करतात. हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि देशभरात गोवंश हत्याबंदी व्हावी, यांसाठी ते संतांचे संघटन करत आहेत.

२. धर्मांतरासाठी आदिवासींचा बुद्धीभेद

जातीव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदु समाजाला विविध भागांमध्ये विभाजित केले जात आहे. हिंदु धर्मामध्ये जी जातीव्यवस्था आहे, त्याचा लाभ हे अन्य धर्मीय घेत आहेत. अन्य धर्मीय हिंदूंमधील विविध जातींच्या लोकांचा बुद्धीभेद करतात. जैनांना ते जैन आहात, हिंदु नाहीत. शिखांना सांगतात की, ते शीख आहेत; पण हिंदु नाहीत. बौद्धांना सांगतात की, ते बुद्धाला मानणारे आहेत, हिंदु नाहीत. आदिवासींनाही ‘ते येथील मूलनिवासी आहेत आणि ते हिंदु नाहीत’, असे सांगतात. अशा प्रकारे ते समाजात फूट पाडण्याचे काम करत असतात.

३. ‘संस्कार वाहिनी’च्या महिला कार्यकर्त्यांमुळे धर्मांतराला पायबंद

छत्तीसगडमधील एका गावात ख्रिस्ती प्रचारक पैसा, विवाह, नोकरी, विनामूल्य औषधोपचार यांचे आमीष दाखवून गरीब हिंदूंचे धर्मांतर करत होते. त्या भागात आता ‘संस्कार वाहिनी’च्या २ सहस्र महिला कार्यकर्त्या कार्य करत आहेत. त्यामुळे तेथील लोक त्यांना हव्या असलेल्या गोष्टी ‘संस्कार वाहिनी’कडे मागतात आणि तिच्या कार्यकर्त्या त्यांना साहाय्य करतात. तेथे धर्मांतर करणार्‍यांना घुसू दिले जात नाही. त्यामुळे आदिवासी गावांमध्ये जाऊन हिंदुत्वाचे कार्य करणे, ही काळाची आवश्यकता आहे.’

– पू. श्री रामबालकदास महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान, पाटेश्वर धाम, छत्तीसगड.