Apple Siri Controversy : ‘ॲपल’च्या ‘सिरि’कडून ‘जय श्री राम’ला प्रतिसाद नाही; मात्र ‘सलाम वालेकुम’ला प्रतिसाद

  • उज्जैनमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना पत्र लिहून कारवाईची मागणी

  • ‘आयफोन’वर बहिष्कार टाकण्याची दिली चेतावणी

(‘सिरि’ म्हणजे ‘ॲपल’च्या भ्रमणभाषवरील एक सुविधा ज्याद्वारे वेगवेगळे कार्य करून घेता येऊ शकतात)

ज्योतिषाचार्य पंडित पवन पाठक

उज्जैन (मध्यप्रदेश) – ‘ॲपल’ आस्थापनाच्या ‘सिरि’ (Siri) या सुविधेवर ‘जय श्रीराम’ किंवा ‘जय माता दी’ म्हटल्यावर कोणताही प्रतिसाद दिला जात नाही; मात्र ‘सलाम वालेकुम’ म्हटल्यावर त्वरित प्रतिक्रिया मिळते. यावरून हिंदु संघटनांनी त्याला विरोध केला आहे. ज्योतिषाचार्य, बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांनी याला धार्मिक भेदभाव म्हटले असून मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना पत्र लिहिले आहे. ‘ॲपल’ने त्याच्या सुविधेमध्ये सुधारणा करावी, अन्यथा त्याच्या भ्रमणभाष संच ‘आयफोन’वर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या यावर ‘ॲपल’कडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

१. ज्योतिषाचार्य पंडित पवन पाठक यांचा दावा आहे की, त्यांनी १० ते १५ आयफोनवर याची तपासणी केली. त्यांचे म्हणणे आहे की, ‘जय श्रीराम’ किंवा ‘जय माता दी’ बोलल्यास सिरि कोणतेही स्पष्ट उत्तर देत नाही किंवा शांत रहाते, तर ‘सलाम वालेकुम’ म्हटल्यावर त्वरित प्रतिसाद देते. भारत ‘ॲपल’साठी एक मोठी बाजारपेठ असून येथे कोट्यवधी वापरकर्ते आहेत. अशा परिस्थितीत सर्व धर्मांचा समान आदर केला गेला पाहिजे. यात सुधारणा न झाल्यास ग्राहकांना ‘आयफोन’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जाईल.

विहिंपचे जिल्हाध्यक्ष राजेश आंजना यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना लिहिलेले पत्र

२. विहिंपचे जिल्हाध्यक्ष राजेश आंजना यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना लिहिलेल्या पत्रात याला ‘नियोजित जिहाद’ म्हटले आहे. तसेच ‘हा हिंदूंच्या श्रद्धेवर झालेला आघात आहे’, असे म्हटले आहे. जोपर्यंत ॲपल ही कथित तांत्रिक त्रुटी दूर करत नाही, तोपर्यंत राज्यातील ॲपलचे सर्व स्टोअर्स बंद करण्यात यावेत, असे विहिंपचे म्हणणे आहे.

३. उज्जैनमधून प्रारंभ झालेला हा विरोध आता सामाजिक माध्यमांतूनही होत आहे. यातून मोठे आंदोलन होऊ शकते. तंत्रज्ञानात कोणत्याही प्रकारचा धार्मिक भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

काय आहे सिरि ?

ॲपलचे ‘सिरि’ हे आवाजावर आधारित आभासी सहाय्यक आहे. ते वापरकर्त्यांच्या आवाजातील आदेश समजून विविध कामे करते. उदा. हवामान, बातम्या, शेअर बाजार, क्रीडा निकाल यांची माहिती वापरकर्ते मिळवू शकतात. गाणी वाजवता येतात, तसेच नकाशामध्ये मार्गदर्शन मिळवता येते. या आभासी साहाय्यकामुळे स्मार्ट होम उपकरणे नियंत्रित करता येतात. 

संपादकीय भूमिका

‘ॲपल’च्या भ्रषणभाष संचांची निर्मिती भारतात होते. त्यामुळे भारत सरकारनेच ॲपलला याविषयी आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !