
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – सिंधू जल वाटप करारावरून भारताशी युद्ध करण्याची धमकी पाकच्या संरक्षणमंत्र्यांनी दिल्यानंतर काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाक सैन्याच्या ८ ब्रिगेडने ३५ ‘अँटी ड्रोन युनिट’ तैनात केले आहेत. लेझरने सुसज्ज असलेले हे युनिट हवाई आक्रमणे रोखण्याचे काम करतील. पाकने ‘एआय फेन्सिंग’ही (कृत्रिम बुद्धलमत्तेचा वापर करून निर्माण केलेले एक आभासी कुंपण) केले आहे. याअंतर्गत टार्गेटिंग (लक्ष्य करणे) आणि सर्व्हिलन्स (लक्ष ठेवणे) वेगवान करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (दळणवळण यंत्रणेवर ताबा मिळवून ती निकामी करणे) आणि ‘काउंटर ड्रोन ग्रिड’ही (ड्रोन शोधून नष्ट करणारी स्वयंचलित यंत्रणा) सिद्ध केले आहे. पाकने अफगाणिस्तानला लागून असलेल्या त्याच्या सीमेवरून ५ बटालियन या महिन्याच्या प्रारंभी हलवून नियंत्रण रेषेवरील रावलाकोट आणि कोटली या भागांमध्ये तैनात केल्या आहेत.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !