मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी साधिकेला आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत. 

श्रीराजमातंगीदेवी

१. ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या ४ – ५ दिवस आधी वातावरणात चैतन्यमय आणि आनंदमय स्पंदने जाणवणे  

‘यज्ञस्थळी गेल्यानंतर आम्ही वर्ष २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला आलो आहोत’, असे मला जाणवत होते. या महायज्ञाच्या ४ – ५ दिवस आधीपासूनच मला वातावरणात पुष्कळ पालट जाणवत होता. ‘सकारात्मक, चैतन्यमय आणि आनंदमय स्पंदने पृथ्वीवर येत आहेत’, असे मला जाणवत होते.

२.‘श्री राजमातंगी महायज्ञा’ची व्यापकता ब्रह्मांडापर्यंत आहे’, असे जाणवणे 

‘हा महायज्ञ पृथ्वीवर होत नसून देवलोकात होत आहे’, असे मला जाणवत होते. यज्ञ चालू असतांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘यज्ञस्थळ ब्रह्मांडाच्या पोकळीत आहे. वेदमूर्ती करत असलेले मंत्रोच्चार अंतराळापर्यंत जात आहेत. त्यांची व्यापकता ब्रह्मांडापर्यंत आहे’, असे मला जाणवत होते.’

– सौ. अनिता संजय जमदाडे, डोंबिवली (पूर्व) (२०.५.२०२६)


श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना आणि त्या सेवाकेंद्रातून निघत असतांना साधिकेने अनुभवलेले दैवी क्षण !

१७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या मुंबई येथे आल्या होत्या. ‘१८.५.२०२६ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी साधकांना मार्गदर्शन केले. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.  

१. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना ‘श्री सरस्वतीमातेने विणेची तार छेडावी, त्याप्रमाणे मंजुळ ध्वनी आसमंतात जात आहे’, असे मला जाणवले. 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

२. ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ बोलत असतांना त्यांचे शब्द ब्रह्मांडातील पोकळीत जात असून तेथील जिवांनाही हे मार्गदर्शन ऐकू येत आहे’, असे  जाणवणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ बोलत असतांना त्यांच्या शब्दांमध्ये शिवाच्या डमरूतील नादशक्ती अनुभवता येत होती. ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे शब्द ब्रह्मांडातील पोकळीत जात आहेत आणि तेथील जिवांनाही हे मार्गदर्शन ऐकू येत आहे’, असे मला जाणवले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ सेवाकेंद्रातून निघत असतांना कोकिळा मधुर स्वरात गुंजन करत असणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या सेवाकेंद्रातून निघत असतांना त्या सेवाकेंद्राच्या बाहेर उभ्या राहून १० मिनिटे साधकांशी बोलत होत्या. तेव्हा जवळच्या झाडावर २ कोकिळा अत्यंत मधुर स्वरात कूजन करत होत्या. त्या कोकिळा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आल्या आहेत’, असे एकमेकींना सांगत आहेत’, असे मला जाणवले.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ बोलत असतांना मला एक वेगळाच आनंद जाणवला आणि शांती अनुभवता आली.’ 

– सौ. अनिता संजय जमदाडे, डोंबिवली (पूर्व) (२०.५.२०२६)


‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या सिद्धतेसाठी उभारलेल्या सेवाकेंद्रात सेवा करतांना आलेल्या अनुभूती

सौ. अनिता जमदाडे

श्री राजमातंगी महायज्ञाच्या कालावधीत भोजन व्यवस्थेच्या संबंधित सेवा करतांना ‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत आहे’, असे जाणवणे : ‘१७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या कालावधीत माझ्याकडे भोजन व्यवस्थेच्या संबंधित सेवा होती. १६ आणि १७.५.२०२६ या दिवशी ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या सिद्धतेसाठी उभारलेल्या सेवाकेंद्रात भोजनसेवा करायची आहे’, असे मला समजले. काही अडचणींमुळे तेथे संतांचे छायाचित्र किंवा देवतेचे चित्र लावता येणार नव्हते. आम्ही सेवाकेंद्रात गेल्यावर ‘समोरच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे फेटा घातलेले मोठे छायाचित्र आणि त्याच्या शेजारी श्री राजमातंगीदेवीचे चित्र ठेवले आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. देवी जणू मला म्हणत होती, ‘मी इथे आले आहे.’ तेथील सेवाकेंद्रात सेवा करतांना ‘आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत आहोत’, असे मला जाणवले.’

– सौ. अनिता संजय जमदाडे, डोंबिवली (पूर्व) (२०.५.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक