‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
१. स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांच्या कार्यामागे अदृश्य आध्यात्मिक शक्ती कार्यरत
‘भारत देश हा दैवीशक्तींद्वारे अवतरित झाला आहे. त्यामुळे ती शक्तीच हा देश चालवत आहे. भगवान श्रीकृष्णाने ‘भगवद्गीते’त स्पष्टपणे सांगितले आहे, ‘परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ।’ (अध्याय ३, श्लोक ११), याचा अर्थ, ‘निःस्वार्थपणाने एकमेकांची उन्नती करत परम कल्याणाला प्राप्त व्हाल.’ हा श्लोक परस्पर सहयोगाचा नियम स्पष्ट करतो. ‘मानवाने समाज, निसर्ग आणि ईश्वर यांसाठी आपले कर्म (यज्ञ) निस्वार्थपणे करावे. त्या बदल्यात प्रकृती आणि दैवी शक्ती मानवाच्या कल्याणासाठी अनुकूल होतात. मानवी जीवन हे एकमेकांच्या सहकार्यावर आणि समष्टीच्या कल्याणावर आधारलेले आहे’, हा या श्लोकाचा मुख्य संदेश आहे. भगवंताने आपल्याला यज्ञाच्या माध्यमातून अत्यंत वैज्ञानिक प्रणाली दिली. त्याद्वारे आपण आपला आत्मविकास करून घेऊ शकतो. ऋषींनी प्रगत भारतीय संस्कृती निर्माण केली. ही तीच संस्कृती आहे, जी भगवंताने भगवद्गीतेत सूक्ष्म रूपात सांगितली आहे. आपण त्याचे मूळ सूत्र सोडून जीवन जगू लागलो, तर निश्चितपणे भरकटले जाणार आहोत. भारताला सदैव महान सेनानींची आवश्यकता पडते. त्यांची महर्षि दधीचि यांच्यापासून स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांपर्यंत अखंड शृंखला चालत आलेली आहे. त्या सर्वांच्या मागे सातत्याने एक दैवी शक्ती कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते. ती शक्ती, म्हणजे ‘अध्यात्म’ आहे. ही आध्यात्मिक शक्तीच सर्व ठिकाणी ओतप्रोत होऊन कार्यरत आहे आणि तीच सर्वांना पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे हे आध्यात्मिक बळ आपले कार्य आणि कार्यकर्ते यांच्यात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२. धर्मकार्य वाढवण्यासाठी ईश्वराचे अधिष्ठान आवश्यक !
भारतात पुष्कळ ठिकाणी आध्यात्मिक विश्वविद्यालये चालवली जातात. त्यातील सर्वच आत्म्याला धरून चालवली जातात, असे नाही. ‘तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।’ (अध्याय १६, श्लोक २४), असे ‘भगवद्गीते’मध्ये म्हटले आहे. याचा अर्थ ‘म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे, असे जाणून तू शास्त्रविधीने नमेलेले कर्मच करणे योग्य आहे.’ यानुसार जे कार्य शास्त्रानुसार (भगवद्गीता, वेद इत्यादी) चालत असेल, त्याच कार्याला आपण आध्यात्मिक कार्य म्हणू शकतो. हे कार्य आणखी पुढे नेण्यासाठी आपल्यातील आध्यात्मिक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरूंची कृपा हवी.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, ‘यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ।’ (अध्याय १८, श्लोक ५) (अर्थ : यज्ञ, दान आणि तप रूप कर्म टाकणे योग्य नाही. उलट ते अवश्य केले पाहिजे.) आणि ‘यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ।’ (अध्याय १८, श्लोक ३), हा उपदेश करतात. याचा अर्थ असा की, ‘यज्ञ, दान आणि तप रूप कर्मे टाकणे योग्य नाही.’ भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात, ‘मनुष्य कर्मयोगाची सीमा पार करून कार्य करू लागतो, तेव्हा त्याची चित्तशुद्धी होते आणि त्याला ईश्वराच्या प्रसादाचा अनुभव यायला आरंभ होतो. आपण भगवद्गीतेनुसार कार्य करत गेलो, तर आपल्यात ईश्वरच प्रकट होण्यास आरंभ होईल. कालांतराने हे कार्य मी करत नसून माझ्या माध्यमातून दैवी शक्तीच कार्य करत आहे, असे वाटू लागेल. त्यामुळे भगवंत अर्जुनाला म्हणतात, ‘तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।’ (अध्याय ८, श्लोक ७), म्हणजे ‘हे अर्जुना, तू सर्वकाळी माझे स्मरण कर आणि युद्धही कर. (कर्तव्य कर.)’ अशा प्रकारे प्रत्येक कर्म करतांना ईश्वराचा आधार घेतला, तर आपले कार्य अधिक तेजस्वी होत जाईल.’
– महंत स्वामी समानंदगिरि महाराज, प्रबंध न्यासी, ‘संवित् गंगायन ट्रस्ट’, हरिद्वार आणि ‘सप्तमातृका आश्रम’, महेश्वर, मध्यप्रदेश.
आम्ही (भारत) अमेरिका आणि युरोप यांना ऐकत नाही, मग तुम्ही कोण ?
कॉकरोच वक्तव्य ते भारतविरोधी कथानकांचे जाळे : मानसिक युद्ध पालटत्या जगाचे !
‘धर्मादाय’ रुग्णालये कागदावर, प्रत्यक्षात मात्र गरिबांची लूट !
भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !
समाधानी, आनंदी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असलेले उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील डॉ. भूपाल भाऊ शेंडे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८८ वर्षे) !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !