
चिपळूण – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सावधान आणि सतर्क झाली तालुक्यातील १७ संभाव्य दरडग्रस्त गावे घोषित करण्यात आली आहेत. या १७ ठिकाणी प्रशासनाकडून कायम लक्ष ठेवण्यात येणार आहे.
दरडग्रस्त अशा या १७ ठिकाणी नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली असून जनजागृती पथके आणि नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये कोणतीही जीवितहानी होऊ नये, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून प्रशासनाने ही सिद्धता केली आहे.
येथील उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या आवारात मान्सूनपूर्व सिद्धता आणि पूनर्वसन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पेढे, परशुराम, परशुराम घाट, तिवरे, रिक्टोली, तिवडी, नांदिवसे, कादवड, ओवळी, कळकवणे, पिंपळी, कोळकेवाडी, कुंभार्ली, पेढांबे, येगाव, कळंबट, गोवळकोट आणि पाचाड या गावांतील वाड्यांचा संभाव्य दरडग्रस्त क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.
महसूल प्रशासनाने येथे रहाणार्या ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत, तसेच सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.अशा धोकादायक ठिकाणी महसूल, पोलीस प्रसासन, आरोग्य, ग्रामपंचायत आणि अन्य विभागांना समन्वय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याचप्रमाणे तालुक्यात बंद पडलेल्या चिरे आणि दगड खाणी, नद्यांचे डोह, तलाव, धबधबे या पाण्याच्या भागांपासून नागरिक व पर्यटक यांनी दूर रहावे, याविषयी संबंधित ग्रामपंचायतीने जनजागृती करावी, तालुक्यातील आणि शहरातील धोकादायक फलक, होर्डिंग्ज काढून टाकावेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा विभागाच्या धरण परिसरात धोका निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिले आहेत.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !