पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंद, २ धर्मांधांना अटक !

  • पोलिसांवर आक्रमण होऊनही केवळ दोघांना अटक करण्याची पोलिसांची मानसिकता का ?

  • कुदळवाडी येथील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडल्याचे प्रकरण !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ९ जूनच्या मध्यरात्री चिखलीतील कुदळवाडी येथील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई चालू असतांना या कारवाईला विरोध करण्यासाठी मुसलमानांचा ५०० जणांचा जमाव रस्त्यावर आला. कारवाईमध्ये काही मुसलमानांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये ८ पोलीस अधिकारी-कर्मचारी यांसह राज्य राखीव पोलीस दलाचे १३ कर्मचारी घायाळ झाले. पोलिसांनी बळाचा वापर करताच जमाव पांगला. या वेळी पोलिसांनी नाजीम चौधरी, इजाज चौधरी या दोघांना कह्यात घेतले. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चिखली पोलीस ठाण्यात जमावातील ५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

चिखली-कुदळवाडी अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, भंगार मालाच्या गोदामांनी वेढले आहे. बांगलादेशामधून बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या बहुतेक करून भंगार, रद्दी दुकानांमध्ये काम करत आहेत. या अंतर्गत ९ जूनला मध्यरात्री कुदळवाडी, चिखलीतील मशिदी, मंदिर यांसह ११ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण करून उभारलेल्या मशिदी, मदरसा म्हणजे ‘लँड जिहाद’ आहेत ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

या कारवाईवर आता भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी फेसबुकवर स्वत:ची सविस्तर प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. अतिक्रमण करून उभारलेल्या मशिदी, मदरसा म्हणजे लँड जिहाद आहेत यातूनच देशविघातक शक्तींना बळ दिले जाते. लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, व्होट जिहाद अशा प्रवृत्तींच्या बेकायदेशीर आश्रयस्थळांना कदापि अभय दिले जाणार नाही. या धडक कारवाईविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. बेकायदेशीरपणे प्रार्थनास्थळे उभारून धार्मिक प्रचार-प्रसार करणे, हिंदु धर्मियांविषयी द्वेष सिद्ध करून जिहादी प्रवृत्तीला खतपाणी घालणार्‍या अनधिकृत मशिदी, दर्गे आणि मदरसे यांवर कारवाई करावी, यासाठी आम्ही विधानसभा अन् प्रशासकीय पातळीवर सातत्याने मागणी लावून धरली होती. कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासन काम करत आहे. विनाकारण तणावाचे वातावरण करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. (जेव्हा अनधिकृत मशीद, मदरसा किंवा कोणत्याही बेकायदेशीर धार्मिक अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई होते, तेव्हा कायदा हातात घेणे, ही या धर्मांधांची जुनीच पद्धत आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका

खाकी वर्दीवर दगडफेक करण्याचे या समाजकंटकांचे धैर्य होतेच कसे ? यावरून मुसलमानांना कायद्याचा कसलाही धाक उरलेला नाही, हेच अधोरेखित होते.