पाकिस्तानकडून १६ महिन्यांत ६ उपग्रह प्रक्षेपित !
भारताच्या भूभागावर पाळत ठेवण्याची क्षमता !

नवी देहली – पाकिस्तानने अवघ्या १६ महिन्यांत ६ पृथ्वीचे निरीक्षण करणारे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यांपैकी काही उपग्रह चीनच्या साहाय्याने अवकाशात पाठवण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे भारतीय संरक्षण तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
१. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी होऊन वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. आता चीनच्या साहाय्याने पाकिस्तानकडून चालवल्या जाणार्या पाळत ठेवण्याच्या यंत्रणेविषयी (सर्व्हेलन्स नेटवर्क) चिंता वाढत आहे.
२. पाकिस्तानच्या या उपग्रहांच्या मालिकेकडे त्याची अंतराळ क्षमता म्हणून पाहिले जात नाही, तर दक्षिण आशियातील चीनची वाढती गुप्तचर आणि पाळत ठेवण्याची क्षमता यांचाच एक विस्तार म्हणून पाहिले जात आहे.
३. पाकिस्तानचे हे उपग्रह भारतीय भूभागाची तपशीलवार छायाचित्रे घेण्यास, सैन्य तैनातीवर लक्ष ठेवण्यास, हिंदी महासागरातील नौदलाच्या हालचालींचा मागोवा घेण्यास आणि भूमीवरील धोरणात्मक मालमत्ता ओळखण्यास सक्षम आहेत. यामुळे भारताच्या दिशेने पाळत ठेवण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
४. अनेक संरक्षण निरीक्षकांच्या मते, उपग्रहांची जलद गतीने केलेली तैनाती आणि पाकिस्तानसोबतची चीनची दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी यामुळे हे उपग्रह पाकिस्तानी झेंड्याखाली कार्यरत असले, तरी प्रत्यक्षात भारतीय उपखंडावर चीनची पाळत ठेवण्याची क्षमता बळकट करत आहेत.
५. अनेक तज्ञांचे मत आहे की, चीनच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याविना पाकिस्तानची अंतराळ क्षेत्रातील अलीकडील प्रगती शक्य झाली नसती.
६. तज्ञांचे म्हणणे आहे की, चीनच्या पाठिंब्याने पाकिस्तान स्वत:ची अंतराळ-आधारित देखरेख क्षमता वेगाने सक्षम करत असतांना, भारतालाही स्वतःच्या धोरणात्मक अंतराळ कार्यक्रमांना गती देणे आवश्यक आहे.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड