भारतालाही डोकेदुखी

नवी देहली – अमेरिकेने चीनला ‘रेअर अर्थ मिनरल्स’, म्हणजेच दुर्मिळ खनिजे यांवरील निर्बंध उठवण्याचे आवाहन केले होते. तरीही चीनने जपानला या खनिजांपासून बनवलेल्या उत्पादनांच्या निर्यातीवर असलेली बंदी अधिक कठोर केली. यामुळे जपानला होणार्या या चिनी निर्यातीत ८० टक्क्यांची घट पहायला मिळाल्याचे वृत्त आहे. तैवानवरून या २ आशियाई सत्तांमधील तणाव जानेवारीत वाढला होता. यामुळे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने जपानच्या सैनिकी वापरासाठीच्या या खनिज उत्पादनांच्या निर्यातीवर अधिकृतपणे बंदी घातली. ९ जूनला चीनने या बंदीचा पुनरुच्चार केला.
भारताची असुरक्षितता !
या निर्बंधांमुळे पाश्चात्त्य राष्ट्रांच्या पुरवठा साखळीतील एक मोठी असुरक्षितता उघड झाली. जरी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि भारत यांसारख्या देशांकडे दुर्मिळ खनिजांचे साठे असले, तरी त्यांवर प्रक्रिया (प्रोसेसिंग) करण्याची तब्बल ९० टक्के क्षमता एकट्या चीनमध्येच केंद्रीत आहे.
ही ‘दुर्मिळ खनिजे’ महत्त्वाची का ?
दुर्मिळ खनिजे हा १७ खनिजांचा एक गट आहे. तो ड्रोन, टर्बाइन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. यांतील ‘यट्रियम’ या मूलद्रव्याचा वापर सेमीकंडक्टर, जेट इंजिन कोटिंग्ज, लेझर, रडार प्रणाली आणि वैद्यकीय इमेजिंग उपकरणांमध्ये केला जातो.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार