रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा नाटकाच्या निर्मात्याला आदेश
नाटकाचे नाव पालटून सुधारित संहिता पुन्हा सादर करण्याचाही निर्देश !
हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्या लढ्याला मोठे यश !

मुंबई/रत्नागिरी – वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठलभक्ती यांची घोर विटंबना करणार्या अन् विठ्ठलभक्तांना हिंसक दाखवणार्या ‘ईठ्ठला’ या नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती, तसेच वारकरी संप्रदाय यांनी पुकारलेल्या लढ्याला यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा’ने ८ जून २०२६ या दिवशी अधिकृत पत्र काढून त्यात ‘वारकरी संप्रदायाचा अवमान टाळण्यासाठी या नाटकातील सर्व आक्षेपार्ह भाग, श्री विठ्ठलमूर्ती आणि संतांची नावे तातडीने वगळा’, असे आदेश नाट्य निर्मात्याला दिले आहेत.
🚨 Hindu Sentiments Vindicated! 🚨
The Maharashtra Rangabhumi Censor Board has directed the producer of the controversial play ‘Itthala’ to remove objectionable content, change the play’s title, and resubmit a revised script for approval.
This comes as a major victory for the… pic.twitter.com/81S7h4ygGg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
१. रत्नागिरीत झालेल्या ६४ व्या ‘राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धे’त वीरशैव समाज (लांजा) निर्मित आणि अमोल रेडीज लिखित-दिग्दर्शित ‘ईठ्ठला’ नाटक सादर झाले होते. त्यातील पात्रांना ‘तुका’, ‘जना’, ‘नामा’ अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून खून आणि मुलाची हत्या दाखवत वारकर्यांना गुन्हेगार ठरवले होते.
२. हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी यांनी याला आक्षेप घेत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सचिव सं.पुं. खामकर यांनी नाट्य निर्मात्यांना दिलेल्या आदेशात म्हटले की, नाटकातील पात्रांना दिलेली संतांची नावे पालटावीत. नाटकाचे शीर्षक पालटावे. नाटकातील प्रमुख कुटुंब ‘वारकरी’ न दाखवता धार्मिक, साधाभोळा सेवेकरी परिवार दाखवावा. त्यांच्याकडून कुणाचीही हत्या केल्याचे दाखवू नये, म्हणजे विशिष्ट संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. रंगमंचावर प्रत्यक्ष विठ्ठलाची मूर्ती आणि त्या अनुषंगाने येणारे वादग्रस्त प्रसंग टाळावेत. ‘कुणाला मारू नये’, असे कुठे लिवलय का विठ्ठलाने ?’ हे संतापजनक वाक्य संहितेतून वगळावे. सुधारित नाट्यसंहिता मान्यतेसाठी सादर करावी.
३. समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेताच त्यांनी तातडीने नोंद घेत निर्मात्यांची कानउघाडणी केली होती.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळाने याची गंभीर नोंद घेऊन आदेश दिल्यासाठी वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक