
शिर्डी – येथील श्री साईबाबा मंदिर परिसरातील प्रसाद विक्री केंद्रांवर निकृष्ट दर्जाचे आणि बुरशी आलेले पेढे विकले जात आहेत. त्यामुळे साईभक्त संतप्त झाले आहेत. अनेक पेढ्यांच्या पाकिटांवर उत्पादनाचा दिनांक, वापरण्याचा अंतिम दिनांक आणि उत्पादकाची माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे पेढ्यांची निर्मिती, त्यांची गुणवत्ता यांविषयीची माहिती कळत नाही.
भाविकांच्या मते, हा प्रकार अनेक वर्षांपासून चालू आहे; मात्र याकडे शिर्डी नगरपालिका, तसेच अन्न आणि औषध प्रशासन यांचे लक्ष नाही. ‘संबंधित विभागांनी नियमित पडताळणी करून दोषींवर कारवाई करावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन इतके निष्क्रीय कसे ? – संपादक)
संपादकीय : सरकारी शाळा बंद का पडतात ?
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !
बारसू-सोलगाव अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात पंचायत समितीचा एकमुखी ठराव
‘पोकलेन’ विकासाने केरळम्मधील ‘वायनाड’ जात्यात, तर कोकण सुपात !
Maharashtra Monsoon Session 2026 : पश्चिम महाराष्ट्रातील दुधात आढळली २५ टक्के भेसळ !