UDISE Plus Report : देशभरात प्रतिदिन सरासरी १३ शाळा होतात बंद !

नवी देहली – एकात्मिक जिल्हा शिक्षण माहिती प्रणालीच्या (‘यू-डायस प्लस’च्या) अहवालानुसार वर्ष २०२५-२६ मध्ये देशात ४ सहस्र ७९१ शाळा बंद झाल्या. याचाच अर्थ प्रतिदिन सरासरी १३ शाळा बंद होत आहेत. यांपैकी २ सहस्र ४२६ शाळा एकट्या मध्यप्रदेशातील असून त्यानंतर तेलंगाणाचा क्रमांक लागतो. तेलंगाणात १ सहस्र ३९२ शाळा बंद झाल्या आहेत. त्यापाठोपाठ बंगालमध्ये ५६८ शाळा, आंध्रप्रदेशात ४७४, तामिळनाडूत ३६९ शाळा, कर्नाटकात २८१, हिमाचल प्रदेशात २६६ शाळा बंद पडल्या आहेत.

५ सहस्र ६६३ शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत; परंतु शिक्षक मात्र २० सहस्र ६६७ !

देशात शून्य पटसंख्या असलेल्या, म्हणजेच विद्यार्थी नसलेल्या शाळांच्या संख्येत प्रथमच घट नोंदवली गेली आहे. शून्य पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या गेल्या एका वर्षात ७ सहस्र ९९३ वरून ५ सहस्र ६६३ पर्यंत न्यून झाली आहे. यामध्ये २० सहस्र ६६७ शिक्षक मात्र कार्यरत आहेत. बंगालमध्ये गेल्या वर्षी शून्य पटसंख्या असलेल्या शाळांच्या संख्येत ३२१ शाळांची वाढ नोंदवली गेली. या शाळांमध्ये १ सहस्र ५७३ शिक्षकही होते. या शिक्षकांच्या समोर शिकायला विद्यार्थीच नाहीत. बंगालमध्ये ४ सहस्र १३३ शाळांमध्ये १९ सहस्र ५०२ शिक्षक कार्यरत आहेत, ज्यांच्यासमोर शिकवायला विद्यार्थीच नाहीत.

मुलींच्या प्रवेशात ४२.२ टक्क्यांनी वाढ !

‘अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण’ अहवालानुसार उच्च शिक्षणात मुलींचा सहभाग वाढत आहे. गेल्या १० वर्षांत मुलींच्या प्रवेशात ४२.२ टक्क्यांनी वाढ झाली असून उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण आता मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

हे सरकारला लज्जास्पद ! अशी दुःस्थिती होण्यामागे विद्यार्थ्यांचा दोष आहे कि शिक्षणप्रणालीत त्रुटी आहेत ?, याचा सरकारने अभ्यास करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !