
१. कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले घरी वास्तव्यास आल्यावर त्या कठीण प्रसंगांची तीव्रता हळूहळू अल्प होत जाणे
‘वर्ष १९९९ ते २००३ या कालावधीत आमच्यावर कठीण प्रसंग ओढवला होता. त्या कालावधीत आम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास भोगावा लागत होता. त्यामुळे आमचा देवावरचा विश्वास ढळू लागला होता. तेव्हा अकस्मात् आमच्या गावात सनातनचा सत्संग चालू झाला. तेव्हा आम्हाला येत असलेल्या अडचणींविषयी आई सत्संगात सांगायची. नंतर आई आणि माझी बहीण नियमितपणे सत्संगात जाऊ लागल्या. वर्ष २००० मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी जागेची आवश्यकता होती. त्या वेळी आई-बाबा (सौ. पूनम प्रभुदेसाई आणि श्री. परशुराम प्रभुदेसाई, दोघांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) प.पू. डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) ओळखतही नव्हते. तेव्हा आई-बाबांनी कुठलाही विचार न करता गुरुचरणी घर अर्पण केले. प.पू. डॉक्टर आमच्या घरी वास्तव्याला आले. त्यानंतर काही कालावधीने हळूहळू आम्हाला होत असलेल्या त्रासाची तीव्रता न्यून होत गेली.
२. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे त्या कालावधीत प.पू. रामानंद महाराज, प.पू. जोशीबाबा यांचा आणि अनेक संतांचा चरणस्पर्श घराला झाला.

३. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे लाभलेले जीवनदान !
त्या वेळी प.पू. डॉक्टर आमच्या जीवनात आले नसते, तर कदाचित् आम्ही कुणीच जिवंत राहिलो नसतो. त्या वेळी ‘आमचे जीवन संपले आहे’, असेच आम्हाला वाटत होते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आम्हाला जीवनदान लाभले.
प.पू. डॉक्टरांचे आमच्यावरील हे ऋण कधीही न फिटणारेच आहे. प.पू. डॉक्टर म्हार्दाेळ येथील आमच्या घरी राहिले होते. या गोष्टीला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते म्हार्दोळचे घर प्रभुदेसाईंचे घर नाही, तर ते घर प.पू. डॉक्टरांचा आश्रम होता, आहे आणि या पुढेही गुरूंच्या कृपेने असणारच आहे.
आम्ही प्रभुदेसाई कुटुंबीय प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– श्री. गिरिजय परशुराम प्रभुदेसाई, म्हार्दोळ, गोवा. (१४.४.२०२६)
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !