
१. श्री. आत्माराम जोशी आणि त्यांचे कुटुंबीय सत्संगाला आल्याचे पाहून ‘श्री. आत्माराम जोशी यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असावी’, असे वाटणे

‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेत अनेक वर्षांपासून असलेल्या (जुन्या) साधकांना बोलावले आहे’, असा निरोप मिळाल्याने मी सत्संगाला आले होते. माझे आई आणि बाबा (सौ. पूनम प्रभुदेसाई आणि श्री. परशुराम प्रभुदेसाई) अन् माझी मोठी बहीण सौ. आरती कामत हिलाही सत्संगाला बोलावले होते. त्यामुळे ‘काहीतरी विशेष आहे’, असे मला जाणवले.
श्री. आत्माराम जोशी आणि त्यांचे कुटुंबीय सत्संगात दिसल्यावर ‘आप्पामामांची (श्री. आत्माराम जोशी यांची) आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असावी’, असे मला वाटले.

२. श्री. आत्माराम जोशी आणि श्री. परशुराम प्रभुदेसाई (साधिकेचे वडील) गुरुदेवांविषयी बोलत असतांना गुरुदेवांच्या सत्संगातील क्षणांचे स्मरण होणे अन् शरिरावर रोमांच येणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी जुन्या आठवणी सांगून श्री. आत्माराम जोशी यांना बोलायला सांगितले. ते गुरुदेवांविषयी सांगत असतांना ते सांगत असलेले प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर येत होते आणि माझी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी म्हार्दोळ येथे आमच्या घरी वास्तव्यास असतांना अनुभवायला मिळालेल्या क्षणांविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी माझ्या बाबांना सांगायला सांगितले. बाबा बोलत असतांना ‘गुरुदेव समवेत आहेत’, असे मला जाणवत होते. गुरुदेवांच्या सत्संगातील प्रत्येक क्षणाचे मला स्मरण होऊन माझ्या शरिरावर रोमांच येत होते. ‘त्या स्थितीतून बाहेर येऊ नये’, असे मला वाटत होते.
३. त्या सत्संगात श्री. आत्माराम जोशी आणि माझे आई-बाबा (सौ. पूनम प्रभुदेसाई आणि श्री. परशुराम प्रभुदेसाई) यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.
‘आई-बाबांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे एकाच वेळी घोषित करून आम्हाला अमूल्य अशी भेट दिली’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म हॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी, फोंडा, गोवा. (१४.४.२०२६)
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद