
सोलापूर – येथे ‘हिंदु राष्ट्र सेने’च्या वतीने १५ ते ३१ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा समारोप पंचमुखी हनुमान देवस्थान येथे उत्साहात झाला. या वेळी प्रशिक्षणार्थी मुलींनी लाठी-काठी, दांडपट्टा आणि तलवार यांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमात राज्यसभेच्या शिवसेनेच्या खासदार सौ. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, समाजातील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र सेना गेल्या ५ वर्षांपासून अशा शिबिरांद्वारे मुलींमध्ये शौर्य, धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य करत आहे. जिजामाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श मुलींसमोर ठेवला जात आहे.
या शिबिरात ‘रुद्रशक्ती गुरुकुल’च्या प्रशिक्षकांनी मुलींना पारंपरिक स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमास हिंदु राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख श्री. रवि गोणे, शहर संघटक श्री. आनंद मुसळे यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर शहरात प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात मुली-महिला बेपत्ता होत असल्याने माता-भगिनींमध्ये स्वसंरक्षणाची भावना जागृत करण्यासाठी शिबिर आयोजित केल्याचे आयोजकांनी सांगितले.
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
Indus Water Treaty Crisis : सिंधू जल वाटप करारावरून पाकने काश्मीरमधील सीमेवर तैनात केले ३५ ड्रोनविरोधी युनिट !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !