जालना जिल्ह्यातील शाळेत शिरच्छेदाच्या इस्लामी गाण्यावर नृत्य सादर केल्याचे प्रकरण
राष्ट्रीय स्तरावरील हिंदूसंघटनाचा परिणाम !
जालना – जालना जिल्ह्यातील परतूर शहरात असलेल्या ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’ (महंमद पैगंबर यांचा अपमान केल्याची एकच शिक्षा आहे – शिरच्छेद) या पाकिस्तानी इस्लामी गाण्यावर नृत्य केल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले होते. हे प्रकरण ‘ट्रीनी’ या प्रखर राष्ट्रवादी ‘एक्स’ खात्याने जगासमोर आणले. या घटनेवरून भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र संताप व्यक्त केला. वाढत्या दबावामुळे परतूर पोलिसांनी शाळेच्या विरोधात गुन्हा नोंदवला.
🚨 Major Action in Jalna School Dance on Sar-Tan-Se-Juda Song Case!
Director & Principal Tariq Siddiqui, dance instructor Sajid Sheikh, and compere Uzma Tabassum have been arrested after a school program featured a dance to the provocative song.
Upon being contacted by Sanatan… https://t.co/sXjxWn6nQ1 pic.twitter.com/ujqP9D7mYf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 23, 2026
आता या प्रकरणी शाळेचे संचालक आणि प्राचार्य तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदक उजमा तबस्सुम यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. तिघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील कार्यवाही केली जाईल, असे भागवत म्हणाले. हिंदूंच्या या विजयावर ‘ट्रीनी’च्या संपादकांनी ईश्वरी कृपेने हे कार्य करण्यास मिळत आहे, याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
BIG BREAKING: Massive Treeni IMPACT 🔥
All three accused named in the FIR have been arrested in the 'Sar Tan Se Juda' at Kids World English Jalna matter.
Principal/Director: Tarique Siddiqui
Dance Teacher: Sheikh Sajid
Anchor: Uzma Tabassum (Had fled to Hyderabad)Jai Ho! https://t.co/x0OfNGI4Hj pic.twitter.com/rIyd2NFK8T
— Treeni (@treeni) June 23, 2026
शाळेची मान्यता रहित करण्यावर प्रश्नचिन्ह !
हे गाणे सादर करणार्या शाळेवर काही कारवाई होईल का ?, याविषयी सध्या साशंकता आहे. ही शाळा केंद्र सरकारच्या सी.बी.एस्.ई. अभ्यासक्रमांतर्गत नोंदणीकृत आहे. तिची नोंदणी रहित केली जाईल का ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी जालन्याच्या जिल्हा शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी समिती नेमल्यात आल्याचे सांगितले.

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !