
नवी देहली – नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांनी नेपाळने भारताची भूमी बळकावल्याचा दावा संसदेत केला होता. तसेच या संदर्भात ब्रिटनने मध्यस्थी करण्याचे आवाहन केले होते. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, सीमेसंदर्भातील सर्व सूत्रांवर चर्चा आणि निराकरण करण्यासाठी भारत अन् नेपाळ यांच्यात आधीपासूनच द्विपक्षीय यंत्रणा अस्तित्वात आहेत. सीमेचा प्रश्न दोन्ही देशांमधील विषय असून त्यात कोणत्याही तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही.
#WATCH | Delhi | MEA Spokesperson Randhir Jaiswal says, "We have seen the remarks of the Prime Minister of Nepal concerning India India-Nepal boundary as well as the subsequent statement made by the Nepali foreign office on this matter. While close to 98% of the India-Nepali… pic.twitter.com/9JmA7cUk3f
— ANI (@ANI) June 2, 2026
जयस्वाल पुढे म्हणाले की, दोन्ही देशांमधील अनुमाने ९८ टक्के सीमा आधीच निश्चित करण्यात आली आहे; परंतु काही भागांवर अजूनही सहमती होणे शेष आहे. गंडक नदीचा मार्ग पाटलल्यामुळे काही भागांमध्ये सीमेच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले आहेत. याव्यतिरिक्त काही ठिकाणी सीमापार अतिक्रमण आणि ‘नो-मॅन्स लँड’वरील (कोणत्याही व्यक्तीच्या किंवा देशाच्या मालकीचा नसलेला अथवा दोन सीमांमधील तटस्थ प्रदेश) अतिक्रमणाची प्रकरणेही आहेत, ज्यांचे दोन्ही देश मिळून ‘मॅपिंग’ (भूमीची अचूक सीमा, क्षेत्रफळ, स्थान आणि भौगोलिक वैशिष्ट्ये नकाशावर किंवा डिजिटल स्वरूपात नोंदवण्याची प्रक्रिया) करत आहेत.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड