राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची प्रशासनाला चेतावणी; ‘बुरखा हटाव, देश बचाव’ची मागणी

अहिल्यानगर – येथील महानगरपालिकेच्या गंगा उद्यानामध्ये नागरिक, मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येतात; मात्र या सार्वजनिक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सामूहिकरित्या बुरखाधारी मुसलमान महिला नमाजपठण करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कृत्यामुळे उद्यानाचे पावित्र्य भंग पावले असून याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने त्याच ठिकाणी हनुमानचालिसा आणि भजन म्हणण्यात आले, तसेच ज्या ठिकाणी नमाजपठण झाले, त्या भूमीचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करून शुद्धीकरण करण्यात आले.
या वेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी बुरख्याच्या आडून होणार्या संशयास्पद कृत्यांवर प्रखर टीका केली. ते म्हणाले की, अलीकडच्या काळात बुरख्याच्या आडून अनेक चुकीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच माळीवाडा परिसरातील शंकर सावली मठाजवळ एका बुरखाधारी व्यक्तीने गोमांस टाकले होते. ती व्यक्ती स्त्री होती कि पुरुष ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि प्रशासनाने अद्याप आरोपीला पकडलेले नाही. अशा घटनांमुळे आता ‘बुरखा हटाव आणि देश बचाव’, अशी मागणी करण्याची वेळ आली आहे.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ओढले ताशेरे !
आमदार जगताप पुढे म्हणाले की, उद्यानात येणार्या ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी अन् हिंदूंचा वावर न्यून करण्यासाठी झुडपांच्या आडोशाला असा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी पार चौकातही अशाच प्रकारे अतिक्रमण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता, जो आम्ही हाणून पाडला. जर प्रशासनाने या अनधिकृत नमाजपठणाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली नाही, तर हिंदु शांत बसणार नाहीत आणि कायदा हातात घेण्यास मागे-पुढे पहाणार नाही. येथून पुढे ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरीत्या नमाजपठण होईल, त्या प्रत्येक ठिकाणी हिंदु बांधवांकडून ‘देवता पूजन’ करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांनी या वेळी दिली.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !