आक्रमणांवरून अमेरिका-इराण यांच्यातील शस्त्रसंधीचा करार संपुष्टात येण्याचे भय

न्यूयॉर्क / जेरूसलेम – अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी कराराचे प्रयत्न चालू आहे. अशात इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिण भागात हिजबुल्लाच्या ठिकाणांवर आक्रमण करण्याचा आदेश त्याच्या सैन्याला दिला. यामुळे ‘शस्त्रसंधीचा करार धोक्यात येऊ शकतो’, असे वृत्त इराणच्या सरकारी वाहिनीने दिले. करारातील महत्त्वाच्या अटींपैकी एक अट अशी आहे की, इस्रायलने लेबनॉनवर आक्रमण थांबवले पाहिजे. यामुळे ट्रम्प नेतान्याहू यांच्यावर संतापल्याचे बोलले जात आहे. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती एका अमेरिकी अधिकार्याने ‘ॲक्सिओस’ वृत्तसंस्थेला दिली.
या वृत्तात ‘तुम्ही हे काय करत आहात ?’, असा प्रश्न विचारत ट्रम्प नेतान्याहू यांच्यावर खेकसले. तसेच इस्रायलमधील भ्रष्टाचार प्रकरणात आपण पाठिंबा दिल्यामुळेच तुम्ही कारागृहात जाण्यापासून वाचलात, अशी आठवणही ट्रम्प यांनी या वेळी करून दिली.
या वृत्तानुसार ट्रम्प असेही म्हणाले की, तुम्ही पूर्णपणे वेडे आहात. जर मी नसतो, तर तुम्ही कारागृहात असता. मी तुम्हाला वाचवत आलो आहे. प्रत्येक जण तुमचा तिरस्कार करतो. तुमच्या कृतीमुळे प्रत्येक जण आता इस्रायलचा द्वेष करू लागला आहे.
नेतान्याहू ‘जशास तसे’च्या भूमिकेवर ठाम !
ट्रम्प यांच्या आक्षेपांवर नेतान्याहू यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, जर हिजबुल्लाने इस्रायलवर आक्रमण करणे थांबवले नाही, तर इस्रायलही बैरूतवरील लक्ष्यांवर आक्रमण करेल. आमची भूमिका कायम आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman