कच्छ (गुजरात) येथे किरकोळ कारणावरून मुसलमानांकडून गावातील हिंदूंवर आक्रमण !

  • गावाचा वीजपुरवठा खंडित करून दगडफेक

  • हिंदूंना चारचाकीने चिरडण्याचा प्रयत्न

  • २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

भुज (गुजरात) – राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेल्या रायधनपार गावात ३० मेच्या रात्री एका किरकोळ वादावरून शेजारील वरनोरा या मुसलमानबहुल गावातील लोकांनी हिंदूंवर आक्रमण केले. यामध्ये अनेक हिंदु तरुण आणि पोलीस घायाळ झाले असून पोलिसांनी २३ मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार आक्रमणकर्त्यांनी आधी गावाचा वीजपुरवठा खंडित केला आणि त्यानंतर नियोजित कट रचून आक्रमण केले.

स्थानिक हिंदु तरुण दर्शन बरडिया यांच्या तक्रारीवरून माधापार पोलिसांनी २३ मुसलमानांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हिंदूंवर आक्रमण करण्याचा पूर्वनियोजित कट !

तक्रारदार दर्शन बरडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ३० मेच्या रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तेव्हा ते आणि त्यांचे मित्र गावाच्या बाहेर बसले होते. शेजारच्या वरनोरा गावातील मुसलमान तरुणांचा एक गट तिथे आला. त्यांनी शिवीगाळ करत हिंदूंना धमकावले, ‘तुम्ही आमच्याकडे का बघत आहात ? जर पुन्हा पाहिले, तर आम्ही तुम्हाला मारू.’ ही शाब्दिक चकमक लवकरच हाणामारीत पालटली.

जेव्हा हिंदु गावकरी या भांडणाच्या विरोधात एकत्र आले, तेव्हा त्यांना चिरडण्याच्या उद्देशाने भरधाव वेगाने एक चारचाकी गाडी तेथे आली. यातून गावकरी कसेबसे वाचले. यानंतर मुसलमानांनी अधिक लोकांना बोलावले. लगेचच शेजारील वरनोरा गावातून मोठ्या संख्येने मुसलमान तरुण लाठ्या, पाईप, दगड आणि इतर शस्त्रास्त्रे यांसह घटनास्थळी आले. तक्रारीनुसार जमावाने आधी विजेच्या खांबावरील तारा तोडून संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर गावाच्या प्रवेशद्वारावर जमा झालेल्या हिंदूंवर आणि त्यांच्या घरांवर दगडफेक चालू केली. यामध्ये अनेक हिंदु घायाळ झाले. एका हिंदु तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. या वेळी पोलिसांच्या गाड्यांवरही आक्रमण करण्यात आले.

हिंदु संघटनेचा ‘नियोजित कट’ असल्याचा आरोप !

हिंदु युवा संघटनेचे नेते रघुवीर सिंह जडेजा यांनी हे आक्रमण ‘जिहादी मानसिकते’चा परिणाम असल्याचे म्हटले आहे. एखाद्या हिंदूंच्या गावाला लक्ष्य करून आक्रमण करण्यापूर्वी वीज आणि सीसीटीव्ही बंद करणे, हा नियोजित कट होता. त्यांनी वरनोरा गावाची कसून तपासणी करण्याची मागणी केली असून हे गाव ‘जिहादी केंद्र’ बनल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांची कारवाई !

कच्छ पश्चिमचे पोलीस अधीक्षक विकास सुंडा यांनी सांगितले की, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत रात्रीच २३ जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

आरोपींमध्ये सलीम ममद मोखा, अबू सुफियान मोखा, साहिल सिद्दीकी मोखा, अब्बास ममद मोखा, समीर अब्दुल मेमन, रजाक सिद्दीकी मेर, फिरोज रजाक मेमन, शोएब सिद्दीकी मोखा, अमन करीम मेमन, अकरम जुसब मेमन, मजीद इब्राहिम केवरा, हनीफ रमजू केवरा, हनीफ अजीज मेमन, उमर अजीज मेमन, रेहान हनीफ खलीफा, इब्राहिम ममद मेमन, दाऊद इब्राहिम केवरा, एजाज उमर मेर, समीर अजीज मेमन, आफताब हनीफ केवरा, आजाद ममद केवरा, अल्ताफ लतीफ केवरा आणि ममद लाखा मोखा यांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारे मुसलमानांचा जमाव हिंदूंच्या गावावर आक्रमण करायला कच्छ भारतात आहे कि पाकिस्तानात ? राज्यात भाजपचे सरकार असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
  • संख्याबळ आणि निसर्गाचा नियम पहाता ज्याचे संख्याबळ अधिक, त्याचे वर्चस्व असते. या नियमानुसार पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या इस्लामी देशांत हिंदू अल्पसंख्य असल्याने ते मार खात असले, तरी हिंदूबहुल भारतातही तेच मार खातात. मारणारे सीमेपलीकडे बहुसंख्य असले, तरी भारतात अल्पसंख्य आहेत. यावरून हिंदू निद्रिस्त आहेत का ?, असा प्रश्न पडतो. ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !