
१. कृतज्ञता वाटणे
‘७.५.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मदिवस होता. ‘६ ते १०.५.२०२६ या कालावधीत आश्रमात पणत्या लावण्यास सांगण्यात आले होते. ते कळल्यावर मला आतून उत्साह वाटत होता आणि ‘श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्याची संधी आपल्याला मिळत आहे’, याबद्दल मला कृतज्ञता वाटत होती.

२. पहिल्या दिवशी उत्साह वाटणे आणि नंतर आनंदाचे प्रमाण वाढणे
पहिल्या दिवशी पणत्या लावण्याची सेवा करतांना मला उत्साह वाटत होता; मात्र ‘त्यानंतर ही सेवा करतांना आनंदाचे प्रमाण वाढले आहे’, असे मला जाणवत होते.
३. पहिल्या दिवशी वादळी वार्यामुळे पणत्या चांगल्या न पेटल्याने वरुणदेवतेला अन् पणत्यांना प्रार्थना होणे आणि नंतर ‘पणत्या प्रज्वलित रहाण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील आहेत’, असे जाणवणे
पहिल्या दिवशी वार्यामुळे पणत्या चांगल्या पेटल्या नव्हत्या आणि वादळ आल्यामुळे छतावर लावलेल्या काही पणत्या खाली पडल्या. ते पाहून माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे वरुणदेवते, आम्हाला श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभले आहे, तर तूच साहाय्य कर.’ नंतर मी दिव्यांना सूक्ष्मातून सांगितले, ‘आश्रम हा श्री विष्णुस्वरूप गुरूंना सर्वाधिक प्रिय आहे आणि आश्रम श्री गुरूंच्या हृदयातच आहे. अशा आश्रमाला सजवण्याची आणि प्रकाशमान करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे.’ नंतरही वार्याचे प्रमाण पुष्कळ होते; मात्र ‘पणत्या प्रज्वलित रहाण्यासाठी स्वतःच पूर्ण प्रयत्नशील आहेत’, असे मला जाणवत होते.
४. पणत्यांकडे पाहून माझा ‘शून्य’ किंवा ‘महाशून्य’, हा नामजप आपोआप चालू होत असे.
५. पणत्यांच्या चैतन्याने माझे डोळे आपोआप बंद होऊन मला श्री गुरूंचे स्मरण होत होते. माझे मन निर्विचार होत होते आणि ‘याच स्थितीत अखंड रहावे’, असे मला वाटत होते.
६. पणत्यांद्वारे बनवलेल्या रांगोळीच्या संदर्भात सद्गुरु नीलेश सिंगबाळ काढलेले उद्गार आणि त्यांचा साधिकेला झालेला उलगडा !
त्याच दिवशी ‘दीपोत्सवात पणत्यांद्वारे बनवलेली रांगोळी एक दिवस यंत्रासारखी आणि दुसर्या दिवशी शंखासारखी दिसत आहे’, असे सद्गुरु नीलेश सिंगबाळ (वय ५९ वर्षे) यांनी सांगितले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘पणत्यांनी स्वतःला इतके समर्पित केले की, त्यांच्यामध्येही श्री गुरूंचेच तत्त्व आले.’
![]() |
![]() |
७. मला वातावरणात पुष्कळ चैतन्य आणि हलकेपणा जाणवत होता. ‘आपण स्वतःही आतून हलके होत आहोत’, असे मी अनुभवत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वाराणसी आश्रमात मोराचे दर्शन होणे

‘७.५.२०२६ या दिवशी सकाळी ७ वाजता वाराणसी आश्रमातील बागेत एक मोर वावरतांना दिसला. या आधी काही दैवी आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगांच्या वेळीच आश्रमात मोराचे दर्शन झाले होते. या वेळीसुद्धा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीतच आश्रमात मोराचे दर्शन झाले.’
– कु. जया सिंह (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय २५ वर्षे), वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश. (२०.५.२०२६)
८. गुरुदेवांनी मला दीपोत्सव साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल माझी सतत भावजागृती होत होती आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
९. अन्य सूत्र
साधारणपणे मे मासात वाराणसी येथे वातावरण पुष्कळ उष्ण असते; पण या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वातावरणात गारवा जाणवत होता.’
– कु. जया सिंह (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय २५ वर्षे), वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश. (२०.५.२०२६)


देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !