पाकिस्तानच्या संदर्भात अमेरिकेची कोलांटउडी !
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने ३ महिन्यांपूर्वीच पाकच्या क्षेपणास्त्रांवरून दिली होती चेतावणी

सिंगापूर – अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी पाकिस्तानचा क्षेपणास्त्र कार्यक्रम हा अमेरिकेसाठी धोका मानण्यास नकार दिला. सिंगापूरमध्ये आयोजित ‘शांगरी-ला डायलॉग’ या संमेलतान ते बोलत होते. हेगसेथ यांचे हे विधान या वर्षी मार्च महिन्यात अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालाच्या अगदी उलट आहे. त्या अहवालात पाकिस्तानचा लांब पल्ल्याचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिकेसाठी संभाव्य धोका असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स’च्या संचालिका तुलसी गॅबर्ड यांनी संसदेच्या ‘इंटेलिजन्स कमिटी’समोर रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि इराण यांसमवेतच पाकिस्तानचाही उल्लेख केला होता. गॅबर्ड यांनी म्हटले होते की, हे देश अशा प्रकारचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करत आहेत, जे अमेरिकेच्या भूमीला त्यांच्या टप्प्यात आणू शकतात.
🇺🇸 America’s U-Turn on Pakistan! 🇵🇰
“Pakistan’s missile programme poses no threat to the United States,” Washington now claims.
Just three months ago, the U.S. intelligence community had warned about Pakistan’s growing missile capabilities. Now, the narrative has suddenly… pic.twitter.com/h58P9sHhBe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 31, 2026
पाकिस्तानच्या सैन्य नेतृत्वाचे कौतुक
हेगसेथ यांनी पाकिस्तानच्या सैनिकी आणि नागरी नेतृत्वाचेही कौतुक केले. ते म्हणाले, ‘मी येथे भारताचा उल्लेख केला; पण तितक्याच सहजपणे मी पाकिस्तानचाही उल्लेख करू शकलो असतो. शांतता चर्चेत फील्ड मार्शल आणि पंतप्रधान जी भूमिका बजावत आहेत, ती महत्त्वाची आहे.’
यापूर्वीच्या भाषणात हेगसेथ यांनी, ‘भारत हा एक शक्तीशाली देश असून तो स्वतःच्या सैन्याचे आधुनिकीकरण करत आहे. तसेच भारत उच्चस्तरीय सैनिकी मोहिमा टिकवून ठेवण्यासाठी मोठी औद्योगिक क्षमता आणि पायाभूत सुविधाही निर्माण करत आहे’, असे म्हटले होते.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड