३१ मे या दिवशी ‘जागतिक तंबाखूविरोधी दिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘३१ मे’ हा ‘जागतिक तंबाखूविरोधी दिन’ (World No Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘धूम्रपान केल्यानंतर’ व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांवर काय परिणाम होतो ?’ याचा अभ्यास करण्यात आला. यासाठी २२.५.२०२६ या दिवशी एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात (एरव्ही धूम्रपान न करणार्या आणि केवळ गुरूंच्या संशोधनकार्यात आपली सेवा म्हणून) सहभागी असलेल्या साधकाने सिगारेटचे ८ झुरके घेतले. या प्रयोगातील मोजणीच्या नोंदी घेण्यासाठी ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (टीप १) या वैज्ञानिक उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाद्वारे व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांची स्थिती अभ्यासता येते.
भाग १

१. ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रातील सप्तचक्रांचा आकार आणि स्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे

१ अ. चक्राचा आकार : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या संगणकीय चित्रातील एखाद्या चक्राचा आकार योग्य असणे, म्हणजे त्या चक्राशी संबंधित अवयवांना त्या चक्राकडून योग्य प्रमाणात सूक्ष्म ऊर्जेचा पुरवठा होत असणे होय.
१ आ. चक्राची स्थिती : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रामध्ये चक्र मध्यरेषेवर किंवा तिच्या जवळ असणे, म्हणजे चक्राची स्थिती ‘संतुलित’ असणे होय.

१ इ. चक्रांचे कार्य : सामान्यतः मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही खालची ३ चक्रे व्यक्तीला शारीरिक कार्यासाठी लागणारी सूक्ष्म ऊर्जा पुरवतात, तर अनाहत, विशुद्ध, आज्ञा अन् सहस्रार ही वरील ४ चक्रे व्यक्तीला मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी लागणारी सूक्ष्म ऊर्जा पुरवतात.
१ ई. व्यक्तीची डावी आणि उजवी बाजू यांचे कार्य : योगशास्त्रानुसार व्यक्तीच्या डाव्या बाजूला इडा किंवा चंद्रनाडी आणि उजव्या बाजूला पिंगला किंवा सूर्यनाडी असते. चंद्रनाडी शीतल, तर सूर्यनाडी प्रखर असते. व्यक्तीची डावी बाजू सूक्ष्मातील कार्यासाठी, तर उजवी बाजू स्थुलातील कार्यासाठी पूरक असते.
१ ए. चक्र मध्यरेषेच्या डावीकडे किंवा उजवीकडे असणे : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रामध्ये एखादे चक्र मध्यरेषेच्या डावीकडे असणे, म्हणजे ते चक्र अकार्यरत (निर्गुण स्थितीत) असणे किंवा अंतर्मुखता आली असणे. तसेच एखादे चक्र मध्यरेषेच्या उजवीकडे असणे, म्हणजे ते चक्र कार्यरत (सगुण स्थितीत) असणे किंवा बहिर्मुखता आली असणे.
टीप १- ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणाची माहिती

‘बायो-वेल जी.डी.व्ही. उपकरणाद्वारे परीक्षणाचे प्रतिकात्मक छायाचित्र
रशियातील डॉ. कॉन्स्टनटीन कोरोटकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायजेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित ‘बायो-वेल’ हे उपकरण बनवले आहे. व्यक्तीच्या ऊर्जेचे परीक्षण करण्यास उपयुक्त असा एक छायाचित्रक (कॅमेरा) आणि संगणकीय प्रणाली यात वापरलेली आहे. या उपकरणाद्वारे परीक्षण करतांना व्यक्तीच्या हाताच्या प्रत्येक बोटाला एक वेदनारहित हलकासा विद्युत् झटका एका सेकंदापेक्षाही अल्प कालावधीसाठी दिला जातो. त्यामुळे व्यक्तीच्या त्वचेतून ‘फोटॉन’ आणि ‘इलेक्ट्रॉन’ या अतीसूक्ष्म कणांच्या होणार्या प्रक्षेपणास चालना मिळते. प्रत्येक बोटातून होणार्या ‘फोटॉन’ कणांच्या प्रक्षेपणाची छायाचित्रे ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणातील छायाचित्रकाद्वारे टिपली जातात आणि त्याच्या आधारे संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने व्यक्तीचे ऊर्जाक्षेत्र आणि तिची कुंडलिनीचक्रे यांची माहिती मिळते.





२. ‘धूम्रपान करणे’ याचा साधकाच्या प्रत्येक चक्रावर झालेल्या परिणामांचा केलेला तुलनात्मक अभ्यास
या प्रयोगामध्ये व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांची स्थिती दर्शवणारी ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणातील छायाचित्रकाद्वारे टिपलेली संगणकीय चित्रे पुढीलप्रमाणे आहेत. या चित्रांत वरून खाली या क्रमाने १. सहस्रार, २. आज्ञा, ३. विशुद्ध, ४. अनाहत, ५. मणिपूर, ६. स्वाधिष्ठान आणि ७. मूलाधार ही चक्रे दर्शवली आहेत.
२ अ. ‘धूम्रपान करणे’ याचा परिणाम अभ्यासण्यासाठी साधकाची उपकरणाद्वारे पुढील ५ टप्प्यांना केलेली चाचणी आणि त्यातून मिळालेली ५ चित्रे
धूम्रपानाचा परिणाम अभ्यासण्यासाठी धूम्रपान केल्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यातील चित्राची तुलना त्याच्या आधीच्या टप्प्यातील चित्राशी केली आहे, उदा. धूम्रपान केल्यानंतर लगेचच्या टप्प्यातील चित्राची तुलना धूम्रपान करण्यापूर्वीच्या टप्प्यातील चित्राशी केली आहे इत्यादी.
(उर्वरित भाग वाचा १ जून या दिवशी)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ) आणि डॉ. (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.५.२०२६)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1045974.html
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !