इस्लामिक स्टेटचा व्हिडिओ पाहून बाँब बनवण्याचा केला होता प्रयत्न

विनर न्यूस्टॅड (ऑस्ट्रिया) – युरोपातील ऑस्ट्रिया देशातील एका न्यायालयाने २१ वर्षीय तरुणाला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याने वर्ष २०२४ मध्ये व्हिएन्ना येथे टेलर स्विफ्टच्या कार्यक्रमावर आक्रमण करण्याचा कट रचल्याची स्वीकृती दिली होती. त्याला प्रामुख्याने जिहादी आतंकवादाशी संबंधित विविध गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले. बेरान ए. असे या तरुणाचे नाव आहे.
🚨 Remember the Vienna Terror Plot (August 2024)?
A 21-year-old Austrian who planned an ISIS-inspired attack on Taylor Swift’s concert has now been sentenced to 15 years in prison.
The plot was foiled after a CIA tip-off, preventing a potential tragedy at an event expected to… pic.twitter.com/IEaZC1t0TJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2026
१. बेरान ए. याने मशिन गन आणि हँड ग्रेनेड अवैधपणे खरेदी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तसेच त्याने इस्लामिक स्टेटच्या ‘मेक अ बॉम्ब इन द किचन ऑफ युवर मॉम’ (आईच्या स्वयंपाकघरात बाँब बनवा) या शीर्षकाच्या व्हिडिओमधील माहितीवरून ‘ट्रायसिटोन ट्रायपेरॉक्साइड’ हा स्फोटक पदार्थ सिद्ध केला होता.
२. याच खटल्यात त्याच्यावर वर्ष २०२४ मध्ये दोन शालेय मित्रांसमवेत मिळून आखाती देशांतील वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वतंत्रपणे आक्रमणे करण्याचा कट रचल्याचा आरोपही होता.
३. त्याने आणि सह-आरोपी आरडा के. याने मान्य केले की, त्यांनी आक्रमणे करण्यासाठी अनुक्रमे दुबई अन् इस्तंबूल या शहरांचा प्रवास केला होता; परंतु नंतर त्यांनी ती कृती केली नाही. बेरान ए. मार्च २०२४ मध्ये दुबईमध्ये चाकूद्वारे वार करण्याची संधी शोधत होता.
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या