सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. या महायज्ञाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. पुरोहितांनी श्री गणेशाला आवाहन केल्यावर कार्यक्रम स्थळी ‘साक्षात् श्री सिद्धीविनायकाचे आगमन झाले’, असे वाटणे
‘दुपारी ३ वाजता यज्ञ चालू होण्यापूर्वी पुरोहितांनी श्री गणेशाला आवाहन केले. त्या वेळी रणरणते ऊन असूनही थंडगार हवेची झुळूक आली. त्या वेळी कार्यक्रम स्थळी ‘साक्षात् श्री सिद्धीविनायक देवतेचे आगमन झाले आहे’, असे मला जाणवले. अशीच अनुभूती माझी मुलगी कु. चैत्राली कुलकर्णी हिलाही आली.

२. ‘यज्ञकुंडातील धगधगत्या ज्वालेतून शत्रूंच्या संहारासाठी देवीची शस्त्रे बाहेर पडत आहेत’, असे मला वाटत होते.
३. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात देवीतत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले होते.
४. व्यासपिठावर दिव्य सप्तलोकांतील वातावरण निर्माण झाले होते आणि त्याचे संपूर्ण कार्यक्रमस्थळी प्रक्षेपण होत होते. उपस्थित भक्तगण त्यांच्या आध्यात्मिक क्षमतेनुसार त्या वातावरणातील लहरी ग्रहण करून कृतज्ञताभाव अनुभवत होते.
५. यज्ञ करणार्या पुरोहितांचे मुखमंडल अत्यंत तेजस्वी आणि समाधानी दिसत होते. ‘त्यांच्या माध्यमातून ब्राह्मणदेवता (पुरोहित) यजमानांच्या सेवाभावामुळे तृप्त झाल्या’, असे जाणवत होते.
६. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी मला जाणवले, ‘साक्षात् श्री राजमातंगीदेवी आहुती स्वीकारण्यासाठी प्रगट झाली आहे.’
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (१८.५.२०२६)
श्री राजमातंगी महायज्ञाच्या प्रसारासाठी सिद्ध केलेली चलचित्रे पाहून देवीप्रती भाव निर्माण होणे आणि नामजप करतांना देवीचे रूप डोळ्यांसमोर येऊन आनंद जाणवणे

‘महायज्ञाचा प्रसार व्हावा’, यासाठी लहान लहान चलचित्रे (व्हिडिओज्) प्रसारित करण्यात आली होती. त्यांमध्ये ‘श्री राजमातंगी यज्ञाचे महत्त्व, त्या देवीचे माहात्म्य’ इत्यादींचे फारच उत्तम प्रकारे वर्णन केले होते.
ती उत्कृष्ट चलचित्रे पाहून माझ्या मनात श्री राजमातंगी देवीप्रती भाव निर्माण होऊ लागला, तसेच देवीचे माहात्म्य आणि यज्ञाचे महत्त्व माझ्या अंतर्मनावर बिंबले गेले. माझ्या मनात देवीविषयी आंतरिक प्रेम निर्माण झाले. त्याचा परिणाम असा झाला की, यज्ञाच्या २ – ३ दिवस आधीपासून मी कोणताही जप करण्यास आरंभ केला की, अधूनमधून श्री राजमातंगीदेवीचे रूप माझ्या डोळ्यांसमोर यायचे. याची वारंवारता दिवसातून बर्याच वेळा असायची. देवीचे रूप इतके मोहक आणि चैतन्यदायी होते की, ते रूप माझ्या डोळ्यांसमोर आल्यावर मला आतून आनंद जाणवायचा.’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.५.२०२६)
‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या निमित्त सेवा करतांना साधिकेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे केलेले प्रयत्न अन् तिला झालेले लाभ !
‘मुंबई येथे १७ मे २०२६ या दिवशी ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सेवा करतांना ‘माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे झालेले प्रयत्न अन् मला झालेले लाभ’ यांविषयी पुढे दिले आहे.
१. या यज्ञाच्या संदर्भात मला एक सेवा मिळाली होती; मात्र माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मला ती सेवा करता आली नाही. त्या वेळी माझ्या मनाचा संघर्ष होऊन मी पुष्कळ अस्थिर आणि नकारात्मक झाले होते.
२. देवाने करून घेतलेले प्रयत्न : त्या वेळी देवाने माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करून घेतले अन् मला सकारात्मक ठेवले.
अ. मी उत्तरदायी साधकाला माझी अडचण सांगून दुसरी सेवा मागून घेतली. मी ती सेवा मनापासून करण्याचा प्रयत्न केला.
आ. माझ्यातील जे स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांच्यामुळे मी अस्थिर झाले होते, ते स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची मी सूची बनवली. मी स्वयंसूचना सत्रे करून मनाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला.
इ. माझ्या मनात येणार्या प्रत्येक नकारात्मक विचाराला मी सकारात्मक विचाराची जोड दिली. माझ्या मनातील ज्या नकारात्मक विचारांवर मला मात करणे शक्य होत नव्हते, तिथे मी भावाच्या स्तरावर प्रयत्न करून मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला.
ई. मी प्रयत्नपूर्वक नामजप करून देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न केला.
३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने झालेले लाभ : माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी मी भावाची जोड देऊन प्रक्रिया राबवल्यामुळे मला यज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आनंद मिळाला. मला अकस्मात् संत आणि सद्गुरु यांचे दर्शन झाले अन् प्रक्रियेच्या माध्यमातून देव भेटल्याची अनुभूती घेता आली.’
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे.
(१८.५.२०२६)

१. यज्ञाच्या पूर्वसिद्धतेच्या सेवेसाठी सेवाकेंद्रात राहिल्यावर आलेल्या अनुभूती
अ. श्री राजमातंगी महायज्ञाच्या पूर्वसिद्धतेसाठी मी १५ दिवस दादर येथील एका विद्यालयाच्या परिसरातील सेवाकेंद्रात राहिले होते. महायज्ञाची पूर्वसिद्धता करत असतांनाच आमच्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रियाही गांभीर्याने राबवून घेतली जात होती. या प्रक्रियेतून मला पुष्कळ आनंद मिळाला.

आ. ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत आहे’, असे मला वाटत होते.
इ. महायज्ञाची सेवा पूर्ण झाल्यावरही ‘घरी जावे’, असे मला वाटत नव्हते.
२. यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. जेव्हा ‘श्री राजमातंगी महायज्ञा’ला आरंभ झाला, तेव्हा ‘सर्वत्र चैतन्य पसरले आहे’, असे मला जाणवले. पुरोहितांच्या मंत्रोच्चारांमुळे तेथील चैतन्य हळूहळू वाढत गेले. तेव्हा ‘आम्ही सर्व जण जणू मे २०२५ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ठिकाणी आहोत’, असे मला वाटले.
आ. माझे मन हळूहळू एकाग्र झाले. माझे शरीर पूर्ण स्तब्ध झाले. मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते.
इ. ‘यज्ञकुंडाच्या चारही दिशांना ऋषिमुनी मंत्रोच्चार करून यज्ञात आहुती देत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
ई. मंत्रोच्चार वाढत गेल्यावर ‘श्री राजमातंगीदेवी यज्ञकुंडातून हळूहळू वर येत आहे’, असे मला जाणवले.
उ. भाव जागृत झाल्यामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वहात होत्या. माझे मन स्थिर होते.
ऊ. ‘यज्ञाच्या ठिकाणी आकाशातून देवी-देवता आल्या आहेत आणि त्या आनंदाने पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवले.
ए. देवीची आरती चालू असतांना ‘श्री राजमातंगीदेवी कमळावर बसलेली आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. तेव्हा माझी भावजागृती होऊन माझा श्री राजमातंगीदेवीचा नामजप आपोआप चालू झाला.
‘न भूतो न भविष्यति ।’, असा हा महायज्ञ मला अनुभवता आला. या यज्ञाच्या माध्यमातून मला चैतन्य अनुभवण्याची संधी मिळाली’, याबद्दल तीनही मोक्षगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. नमिता दुखंडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६८ वर्षे), परळ, मुंबई. (१९.५.२०२६)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !