प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील घटना
नोकरीवरून काढून टाकण्याची दिली होती धमकी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील ‘डायसिस ऑफ लखनऊ’अंतर्गत चालवल्या जाणार्या ‘बिशप जॉन्सन गर्ल्स स्कूल अँड कॉलेज’च्या हिंदु मुख्याध्यापिकेवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. मुख्याध्यापिकेने आरोप केला आहे की, संस्थेचे अध्यक्ष बिशप मॉरिस एडगर दान, त्यांचा मुलगा लन दान आणि सचिव राकेश चत्री यांनी नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला.
१. पीडित मुख्याध्यापिकेने २३ मे या दिवशी कर्नलगंज पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी सांगितले की, बिशप आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना असेही म्हटले होते की, ‘तुम्हाला वरच्या अधिकार्यांना संतुष्ट करावे लागेल, तरच तुमची नोकरी टिकून राहील.’ मुख्याध्यापिकेने या प्रकरणात माजी पती विशान नोवेल सिंह यांचेही नाव आरोपी म्हणून दिले आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
२. महिलेने सांगितले की, २ वर्षांपूर्वी तिचा पतीपासून घटस्फोट झाला आहे. आरोपी त्यांच्या घटस्फोटित असण्याचा लाभ घेत असून गेल्या एका वर्षापासून त्यांचे शारीरिक शोषण करत आहेत. आरोपींनी अशाच प्रकारे छळ करून अन्य एका माजी मुख्याध्यापिकेलाही शाळेतून बाहेर काढले होते.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !