Bhatkal Tension : भटकळ (कर्नाटक) येथे हिंदूंनी पुनर्उभारणी केलेले ‘मूरीनकट्टे’ मुसलमानांनी पाडले !

पोलिसांवर केली दगडफेक

(मूरीनकट्टे म्हणजे देवाची शिदोरी ठेवण्यासाठीचे लहान मंदिर)

भटकळ (कर्नाटक) – येथील ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी २४ मेच्या रात्री व्यंकटापूरजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला पुनर्उभारणी केलेले मूरीनकट्टे रात्रीच्या वेळी तिथे जमलेल्या मुसलमान तरुणांनी पाडले. त्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

१. गेल्या शेकडो वर्षांपासून हिंदूंच्या धार्मिक भावनेचे प्रतीक असलेली ही जागा महामार्गासाठी हिंदूंनी स्वत:हून मोकळी करून दिली होती. महामार्ग विभागाने मूरीनकट्टे इतरत्र बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र अनेक वेळा विभागाला सांगूनही मंदिराची इतरत्र पुनर्उभारणी करण्यात आली नाही.

२. शेवटी हिंदु संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला मूरीनकट्टे बांधले.

३. मुसलमान नेत्यांनी मात्र कारण नसतांना या विरोधात आक्षेप नोंदवला आणि ते हटवण्याची मागणी केली. त्यानंतर रात्री शेकडो मुसलमानांनी एकत्र येऊन ते पाडले. तसेच राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद करून घोषणाबाजी केली. यामुळे हिंदु संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झाले. (नुसते संतप्त होऊन उपयोग नाही. हिंदूंचा संताप असा असला पाहिजे की, त्यामुळे हिंदुविरोधी भयभीत झाले पाहिजेत. अन्यथा बांगलादेश-पाकिस्तानातही हिंदूंची मंदिरे पाडली जातात आणि भारतातील कर्नाटकातही ! – संपादक)

४. मंदिराच्या परिसरात कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांवरही मुसलमान नेत्यांनी आक्रमण केले. त्यामुळे भटकळमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली.

५. पोलिसांनी मुसलमानांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप करून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी भटकळ शहर पोलीस ठाण्याच्या आवारात रात्री उशिरापर्यंत निदर्शने केली. भाजप, तसेच हिंदु जागरण वेदिकेसह अनेक संघटनांनी निदर्शने करण्याची सिद्धता केली आहे.

६. उत्तर कन्नड जिल्हा पालकमंत्री मंकाळ वैद्य यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करतांना आरोपींवर कठोर कारवाईची चेतावणी दिली आहे.

भटकळमध्ये ३ दिवस जमावबंदी !

खबरदारीचा उपाय म्हणून २७ मेपर्यंत पोलीस प्रशासनाने भटकळ शहर, तसेच त्याला लागून असलेल्या जाली नगर पंचायत हद्दीत जमावबंदी लागू केली आहे.

मुसलमानांची मूरीनकट्टे पाडण्याची कारवाई ‘अक्षम्य’ ! – भाजप

भाजप नेते गोविंद नाईक यांनी यासंदर्भात म्हटले की, मूरीनकट्टे अचानक निर्माण झाले नाही. पूर्वीपासून असलेले हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले होते; परंतु ते हटवण्याची कारवाई अक्षम्य आहे. याच्या विरोधात तीव्र स्वरूपाची निदर्शने करू, असा इशाराही नाईक यांनी या वेळी दिला.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानसारखीच राजवट असलेल्या काँग्रेसच्या सत्तेतील कर्नाटक राज्यात याहून वेगळे काय घडणार ? भेद केवळ एवढाच की, पाकमधील पोलीस हे मुसलमानच असल्याने त्यांच्यावर तेथे दगडफेक होत नाही. कर्नाटकात मात्र कायदा-सुव्यवस्थेचे सुवेरसुतक नसलेले मुसलमान बहुसंख्यांक हिंदु पोलिसांवरही आक्रमण करतात !