लिंगायत समाजाच्या बेंगळुरू धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी यांचे विधान
लिंगायत बांधवांनी जनगणनेत केवळ ‘लिंगायत’ म्हणून नोंद करण्याचे केले आवाहन !
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांचा तीव्र आक्षेप !

सोलापूर – हिंदु हा धर्म नसून भारतात त्याला अधिकृत मान्यता नाही, त्यामुळे होत असलेल्या जनगणनेमध्ये ‘धर्मा’च्या रकान्यात लिंगायत बांधवांनी केवळ ‘लिंगायत’ असेच नमूद करावे, असे विधान कर्नाटकातील बेंगळुरू धर्मपिठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी यांनी केले. या विधानावर नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘हिंदु हा केवळ धर्म नसून ती राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळख आहे. सनातन वैदिक संस्कृतीसह बौद्ध, जैन आणि शीख हे सर्व याच व्यापक व्याख्येत येतात. ज्यांची पितृभूमी आणि पुण्यभूमी ही भारत आहे, ते सर्वच हिंदु आहेत.’’
“Hinduism’ is not a religion and has no official recognition!”
– Janabasavananda Swami, head of the Bengaluru Dharmapeetha of the Lingayat communityHindu Dharma is the very identity of India. All ancient scriptures glorify Sanatan Hindu Dharma.
Do other heads of Lingayat… pic.twitter.com/lDmJfyZ9cD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 25, 2026
जनबसवनंद स्वामी यांनी मांडलेली सूत्रे
१. भारतात सध्या अधिकृतपणे जैन, बौद्ध आणि शीख या ३ भारतीय समाजाला स्वतंत्र धार्मिक मान्यता आहे.
२. ब्रिटीश राजवटीमध्ये ‘लिंगायत समाजा’ला स्वतंत्र धार्मिक मान्यता होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही मान्यता मोडित निघाली.
३. ‘लिंगायत धर्मा’ला सार्वजनिक आणि कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी आगामी जनगणनेचा उपयोग करणे आवश्यक आहे.
४. यासाठी २ जून २०२६ पासून सोलापूरच्या मंगळवेढा येथून थेट मुंबईपर्यंत ‘भव्य लिंगायत धर्म जागृती यात्रा’ काढण्यात येणार आहे.
भारताचे धार्मिक ऐक्य धोक्यात येईल ! – महंत सुधीरदास![]() लिंगायत समाज हा हिंदु धर्म आणि सनातनी विचार याद्वारेच पूजा करतो. अशा प्रकारे प्रत्येक संप्रदायाने स्वतंत्र धर्माची मागणी केल्यास भारताचे धार्मिक ऐक्य धोक्यात येईल. समाजात दुफळी निर्माण होईल. जनबसवनंद स्वामी यांनी ‘हिंदु धर्माची व्याख्या नीट समजून घेऊन स्वत:चे विधान मागे घ्यावे’, असे आवाहन महंत सुधीरदास यांनी केले. |

FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’