दगड आणि लाकडी दांडके यांनी केले आक्रमण

महागाव (यवतमाळ जिल्हा) – येथील बिजोरा पथकर नाक्याजवळ गोवंश तस्करांनी गोरक्षक गजानन सुरोशे यांच्यावर दगड आणि लाकडी दांडके यांनी जीवघेणे आक्रमण केले. त्यात सुरोशे यांचा मृत्यू झाला. येथील सीसीटीव्हीत हा प्रकार चित्रीत झाला आहे.
१. रात्री बजरंग दलाचे काही कार्यकर्ते पथकर नाक्यावर उभे होते. एका पिकअप वाहनात ८ ते १० गोवंशीय असल्याची शंका आल्याने कार्यकर्त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहनाने धक्का देत कार्यकर्त्यांच्या दुचाकीला पाडले. यात दोघे जण घायाळ झाले.
२. या वेळी गोरक्षक गजानन सुरोशे वाहनाने जात होते. त्यांनी पिकअपचा पाठलाग केला. तेव्हा गोतस्करांनी त्यांच्या वाहनावर तुफान दगडफेक केली. लाकडी दांडके आणि काठ्या यांनी आक्रमण केले. यात त्यांचा मृत्यू झाला. गोतस्करांनी गोवंशियांना तेथेच सोडून पळ काढला.
३. बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात गर्दी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. (अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! – संपादक)
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक