‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१. हलाल मांस विक्रीच्या विरोधात उच्च आणि सर्वाेच्च न्यायालयात याचिका
‘वर्ष २०१४ मध्ये आम्ही ‘डेंजर्स ऑफ हलाल’ या नावाने ५ मिनिटांची एक चित्रफीत बनवली होती. त्याला २ लाख दर्शक संख्या लाभली. त्यानंतर प्रक्षोभक भाषणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘यू ट्यूब’ने ती काढली. वर्ष २०१७ मध्ये आम्ही ‘डेंजर्स ऑफ हलाल’ या नावाने दुसरी चित्रफित बनवली. ही चित्रफीत आजही ‘यू ट्यूब’वर आहे. मांस व्यवसायात मक्तेदारी करण्यासाठी प्रत्येक मांसाहारी विक्रेत्याच्या दुकानात ‘हलाल स्टिकर’ लावण्यात आले होते. त्यानंतर हिंदु विक्रेत्याला परवाना घेण्यासाठी १५ सहस्र रुपये द्यावे लागत होते. ८५ टक्के लोकसंख्या प्रमाण असलेल्या हिंदु समाजाला हलाल मांस खाण्यास भाग पाडले जात होते. या हलाल जिहादच्या विरोधात आम्ही कर्नाटक उच्च न्यायालयात एक रिट याचिका केली. त्याने काहीही झाले नाही; म्हणून सर्वाेच्च न्यायालयात जनहित याचिका केली.
हिंदु जनजागृती समितीशी संलग्न असल्याचा मला अभिमान आहे !

भारतात हलाल जिहादविरोधी जागृती करण्याचे सर्व श्रेय हिंदु जनजागृती समितीला जाते. त्यांनी आवाज उठवला नसता, तर देशातील ‘हलाल जिहाद’ विषय बाहेर आला नसता. धर्मांध हिंदूंच्या खिशातून कर वसूल करत आहेत आणि त्यातून आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य होत आहे. अशा प्रकारे देशात समांतर हलाल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे, हे कुणालाच समजले नसते. हा विषय राष्ट्रीय पातळीवर आणण्याचे सर्व श्रेय हिंदु जनजागृती समितीला जाते. त्यामुळे मी समितीशी संलग्न असल्याचा मला अभिमान आहे.’
– श्री. प्रशांत संबरगी
२. ग्राहक संरक्षण न्यायालयाच्या माध्यमातून संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ हलाल मांस विक्रेत्यांना नोटीस
अनेक संकेतस्थळांवर ‘ऑनलाईन’ मांस आणि मासळी विक्री केली जात होती; पण तेथे सर्व हलाल मांसच विकले जात होते. तेथे झटका मास घेण्याचा पर्याय नव्हता. याविरोधात मी ग्राहक संरक्षण न्यायालयात गेलो. त्यांनी ‘हलाल मासांसमवेत झटका मांस विकावे लागेल, अन्यथा ते ग्राहक अधिकाराचे उल्लंघन होईल’, अशी नोटीस काढली. या नोटीसच्या आधारावर आम्ही त्या सर्व हलाल मांस विक्री करणार्या संकेतस्थळांना नोटीस पाठवली. सर्वप्रथम ‘बिग बास्केट’ या ‘टाटा ग्रुप’च्या आस्थापनाने त्यांच्या संकेतस्थळावर झटका मांस उपलब्ध असल्याचे नमूद केले. यावरून ‘ग्राहक मंचाच्या माध्यमातून आपण जिल्हास्तरावरही हलाल मांसाच्या विरोधात तक्रार करू शकतो’, असे लक्षात आले.
हलाल आणि झटका मांस यांतील भेदहलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यात प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते. याउलट हिंदु किंवा शीख धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्यांची हत्या केली जाते. त्यात प्राण्यांची मान एकाच घावात कापली जात असल्याने त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो. |
३. धर्मांधांकडून झटका मांस विक्री करणार्या प्रवीण नेट्टारूची हत्या

वर्ष २०२२ मध्ये आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली एक चळवळ चालू केली. कर्नाटकमध्ये सर्व मांस विक्री करणारे हिंदु व्यावसायिक आणि त्यांचे भ्रमणभाष क्रमांक शोधून काढले. त्याचे मूल्य हिंदूंना चुकवावे लागले. एका वर्षातच २६ जून २०२२ या दिवशी धर्मांधांनी झटका मांस विकणार्या प्रवीण नेट्टारू यांची हत्या केली. नेट्टारू यांनी त्यांच्या दुकानावरील धर्मांध कर्मचार्याला काढले होते, तसेच ‘हलाल स्टीकर’ काढून तेथे ‘झटका मांसविषयीचे स्टिकर लावले होते. प्रवीण यांच्या हत्येच्या प्रकरणात १२ लोकांना अटक झाली. मला पोलीस उपायुक्तांनी बोलावले. ते म्हणाले, ‘त्या सर्वांच्या भ्रमणभाषमधील ‘व्हॉट्सॲप’ गटावर तुमचे छायाचित्र आहे. तुमच्या सुरक्षेसाठी एक बंदुकधारी देण्यात येईल; पण तुम्हाला ही मोहीम बंद करायला हवी.’ मी त्यांना सांगितले, ‘मी हे कार्य बंद करू शकत नाही, तसेच हिंदु समाज त्याच्या हिंदु बांधवाला सुरक्षा देऊ शकत नसेल, तर ‘एके ४७’नेही काही काम होणार नाही.’
बेरोजगार हिंदु तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एक कृती दल (टास्क फोर्स) सिद्ध केले. परवाना, वस्तू व सेवा कर नोंदणी आणि शीतकपाट यांसह १० x (बाय) १० फुटाचे दुकान उघडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे भारतातील धार्मिक मक्तेदारी असलेल्या हलाल व्यवसायाला खीळ बसेल, तसेच हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून आतंकवाद्यांना मिळणार्या पैशावर बंधने येतील. ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या अहवालानुसार केवळ भीती निर्माण करण्यासाठी प्रवीण नेट्टारूंसारख्या धर्माभिमानी हिंदूंची हत्या करण्यात आली. त्याला ‘किलिंग स्क्वॉड’ म्हटले जाते. ‘हलालमुक्त भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी आणि हिंदु बांधवांना कोणत्याही भीतीविना मांसविक्री करता यावी, असे मला वाटते.
– श्री. प्रशांत संबरगी, उद्योजक, बेंगळुरू, कर्नाटक.
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !